शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

फ्रेंच ओपन : झ्वेरेव, निशीकोरी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 04:11 IST

जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याने पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात मॅच पॉईंट वाचवल्यानंतर बोस्नियाच्या

पॅरिस : जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याने पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात मॅच पॉईंट वाचवल्यानंतर बोस्नियाच्या दामिर जुमहूरला हरवत पहिल्यांदाच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत चौथ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत युके्रनच्या चौथ्या मानांकित एलिना स्वितलोना हिला पराभवाचा सामना करावा लागला. तर जपानच्या केई निशीकोरी यानेही सहज विजय मिळवला.२१ वर्षांच्या झ्वेरेव याने पिछाडीनंतर पुनरागमन करताना जुमहूर याला चार तास चाललेल्या सामन्यात ६-२,३-६,४-६,७-६(७-३),७-५ असे पराभूत केले. जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू स्पेनच्या राफेल नदाल याच्या ११ वे फ्रेंच ओपन विजेतेपदाच्या मार्गात सर्वात कडवा प्रतिस्पर्धी म्हणून झ्वेरेवकडे पाहिले जात आहे. मात्र आजच्या सामन्यात तो लयीत दिसला नाही. त्याने ७३ सहज चुका केल्या. त्यासोबतच सात डबल्स फॉल्टदेखील केले. आठ वेळा सर्व्हिस गमावली. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये मॅटपॉईंट वाचवत जुमहूरची सर्व्हिस तोडली आणि विजय मिळवला. त्याने पहिल्यांदाच अंतिम १६ मध्ये जागा मिळवली आहे.जपानचा केई निशीकोरीदेखील पुढच्या फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी ठरला. त्याने फ्रान्सच्या जाईल्स सिमोनला सरळ सेटमध्ये ६-३,६-१,६-३ असे पराभूत केले. चौथ्या मानांकित बुल्गेरियाच्या ग्रिगोर दिमीत्रोवला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला फर्नांडो वर्दास्को याने सरळसेटमध्ये पराभूत केले. स्पेनच्या अनुभवी वर्दास्को याने ७-६,६-२,६-४ असा विजय मिळवला. त्याचा पुढचा सामना नोवाक जोकोविच विरोधात होणार आहे. जोकोविच याने स्पेनच्या रॉर्बटो बतिस्ता आगुट याच्यावर ६-४,६-७(६-८), ७-६(७-४), ६-२ असा विजय मिळवला. महिला एकेरीत स्वितलोना हिला ३१ व्या मानांकित रोमानियाच्या मिहाईला बुजारनेस्कु विरोधात पराभवाचा सामना करावा लागला. मिहाईला हिने एलिनावर ६-३,७-५ असा विजय मिळवला. मिहाईलाचा पुढचा सामना अमेरिकेच्या तिसºया मानांकित मेडिसन किज हिच्यासोबत होतील. तिने जपानच्या २१ व्या मानांकित नाओमी ओसाका हिच्यावर सरळ सेटमध्ये ६-१, ७-६ असा सोपा विजय मिळवला. तर कजाकिस्तानच्या युलिया पुतिनत्सेवाने पहिला सेट गमावल्यानंतरही जबरदस्त पुनरागमन करत चीनच्या कियांग वँग हिला १-६, ७-५, ६-४ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)युकी भांबरी, शरण पराभूतपुरुष दुहेरीच्या दुसºया फेरीत भारताच्या युकी भांबरी आणि द्विज शरण पराभूत धाले आहेत. आॅस्ट्रियाच्या आॅलिव्हर माराह आणि क्रोएशियाच्या मॅट पॅव्हिक या जोडीने भारतीय जोडीवर ७-५,६-३ असा विजय मिळवला.फ्रेंच ओपन टेनिसच्या मिश्र दुहेरीत गतविजेत्या रोहन बोपन्नाला यंदा पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. टिमीया बाबोस हिच्या साथीने खेळणाºया बोपन्नाला चीनच्या शुई झान्स आणि आॅस्ट्रेलियाच्या जॉन पेर्स यांनी २-६,३-६ असे पराभूत केले.पुरुष दुहेरीत बोपन्नाचे आव्हान अजून कायम आहे. कॅटरिना स्त्रेवोनिक आणि सॅन्टियागो गोन्सालेक यांनी भारताचा द्विज शरण आणि त्याची जपानची साथीदार शुको ओयामा यांना २-६,६-३,१-०(१०-५) असे पराभूत केले.