शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंच ओपन: थिएम अंतिम फेरीत, उपांत्य लढतीत सेचिनातोवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:51 IST

सातव्या मानांकित डोमिनिक थिएमने उपांत्य फेरीत मार्को सेचिनातोचा ७-५, ७-६, ६-१ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

पॅरिस : सातव्या मानांकित डोमिनिक थिएमने उपांत्य फेरीत मार्को सेचिनातोचा ७-५, ७-६, ६-१ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जेतेपदासाठी थिएम जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि १० वेळचा फ्रेंच चॅम्पियन राफेल नदाल आणि अर्जेंटिनाचा जुआन मार्टिन डेल पोत्रो यांच्यातील विजेत्या खेळाडूविरुद्ध लढेल.जागतिक क्रमवारीत ७२ व्या स्थानावर असलेल्या सेचिनातोने तीन मानांकित खेळाडूंचा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली होती. त्यात १२ वेळा ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचचाही समावेश होता. त्यामुळे थिएमपुढे आगेकूच करण्यासाठी कडवे आव्हान होते. थिएमने उपांत्यपूर्व फेरीत दुसºया मानांकित अलेक्जेंडर झ्वेरेवला नमविले होता. थिएमने पहिल्याच गेममध्ये सेचिनातोची सर्व्हिस भेदली. सहाव्या गेमपर्यंत थिएमच्या सर्व्हिसवर सेचिनातोला केवळ एक गुण मिळवता आला. त्याने आठव्या गेममध्ये सर्व्हिस भेदताना स्कोअर ५-४ असा केला. थिएमने त्यानंतर तीन गेम जिंकत पहिला सेट पटकावला.दुसºया सेटममध्ये सेचिनातोने मॅरेथॉन टायब्रेक खेळला. त्याने तीन सेट पॉर्इंट मिळवल्यानंतरही १२-१० ने टायब्रेक गमावला. हा सेट ६१ मिनिट रंगला, पण तिसºया सेटममध्ये थिएमने त्याला कुठली संधी दिली नाही. या पराभवानंतरही सेचिनातोला ६५८००० डॉलर्स मिळाले आणि पुढील आठवड्यात तो रँकिंगमध्ये अव्वल ३० मध्ये दाखल होईल.

टॅग्स :Sportsक्रीडा