शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

फ्रेंच ओपन : मुगुरुजा, शारापोव्हाची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 03:01 IST

माजी चॅम्पियन गारबाईन मुगुरुजाने आॅस्ट्रेलियाच्या सॅम स्टोसूरचा ६-०, ६-२ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले. मारिया शारापोव्हाने परंपरागत प्रतिस्पर्धी सेरेना विल्यम्सविरुद्ध लढत देण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.

पॅरिस : माजी चॅम्पियन गारबाईन मुगुरुजाने आॅस्ट्रेलियाच्या सॅम स्टोसूरचा ६-०, ६-२ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले. मारिया शारापोव्हाने परंपरागत प्रतिस्पर्धी सेरेना विल्यम्सविरुद्ध लढत देण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.तिसरे मानांकनप्राप्त स्पेनच्या मुगुुरुजाने १५ विनर लगावले आणि पहिला सेट केवळ २५ मिनिटांमध्ये जिंकला. आता पुढच्या फेरीत तिला युक्रेनच्या लेसिया सुरेंकोच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सुरेंकोने १९ व्या मानांकित स्लोव्हाकियाच्या मगडालेना राइबारिकोव्हाचा ६-२, ६-४ ने पराभव केला. परंपरागत प्रतिस्पर्धी सेरेना व शारापोव्हा यांच्यादरम्यान उपउपांत्यपूर्व फेरीत लढत होऊ शकते. शारापोव्हाने सहावे मानांकन प्राप्त कॅरोलिना प्लिसकोव्हाचा ६-२, ६-१ ने पराभव केला. डोपिंग प्रकरणात निलंबनाच्या कारवाईला सामोरे गेल्यानंतर शारापोव्हाने या लढतीत आपला जुना फॉर्म दाखविला. दोनदा जेतेपद मिळवणाऱ्या शारापोव्हाला बंदी असलेल्या औषधाचे सेवन केल्याच्या आरोपामुळे दोन वर्षांपूर्वी निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यानंतर तिला प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत मानांकन मिळाले आहे. एस्तोनियाच्या जर्गेन जोपची लढत जर्मनीच्या मॅक्सीमिलन मार्टररसोबत होईल. महिला विभागात दोनदा उपविजेती ठरलेली हालेपला तिसºया फेरीत जर्मनीच्या आंद्रिया पेत्कोविचसोबत खेळायचे आहे.बोपन्ना - रॉजर व्हॅसेलीन उपांत्यपूर्व फेरीतरोहन बोपन्ना आणि त्याचा फ्रेंच जोडीदार एडवर्ड रॉजर व्हॅसेलीन यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात अग्रमानांकित मार्सेलो मेलो आणि लुकाज कुबोट यांना सरळ सेटमध्ये पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.बोपन्ना आणि रॉजर व्हॅसेलीन या १३ व्या मानांकित जोडीने मार्सेलो मेलो आणि लुकाज कुबोट याना ६-४,६-७ असे पराभूत केले. बोपन्ना याने फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत तिसºयांदा प्रवेश केला आहे. त्याने याआधी २०११ आणि २०१६ मध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

टॅग्स :Sportsक्रीडा