शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंच ओपन : मुगुरुजा, मारिया पुढच्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 02:47 IST

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत गर्बाईन मुगुरुजा, वर्ल्ड नंबर वन सिमोना हालेप, मारिया शारापोवा यांनी

पॅरिस : फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत गर्बाईन मुगुरुजा, वर्ल्ड नंबर वन सिमोना हालेप, मारिया शारापोवा यांनी आपापले सामने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. तर, पुरुषांच्या गटात मारिन सिलीच याने ह्युर्बट हुरकोजवर विजय मिळवून तिसरी फेरी गाठली.जागतिक रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेला मारिन सिलीच याला १८८व्या क्रमांकावर असलेला ह्युर्बट हुरकोज याने चांगलेच झुंजवले. सिलीच याने ६-२, ६-२, ६-७(३-७), ७-५ असा विजय मिळविला. पहिल्या आणि दुसºया सेटमध्ये सोपा विजय मिळविल्यानंतर सिलीचची लय बिघडली. तिसºया सेटमध्ये हुरकोजने त्याच्यावर विजय मिळविला. २ तास ५० मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिलीचला चांगलेच झुंजावे लागले. चौथ्या सेटमध्येदेखील हुरकोजने सिलीचला हैराण केले. मात्र, अखेरीस त्याने ७-५ असा विजय मिळवून सामना जिंकला. सिलीचला पुढच्या फेरीत अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनविरोधात खेळावे लागेल.महिला एकेरीत रोमानियाच्या सिमोना हालेप हिने जागतिक रँकिंगमध्ये ७२व्या स्थानावर असलेली अमेरिकेची टेलर टाऊनसेंड हिच्यावर सरळ सेटमध्ये विजय मिळविला. या विजयासाठी सिमोनाला फारसे परिश्रम घ्यावे लागले नाहीत. तिने ६-३, ६-१ असा विजय मिळवून लढतीवर निर्विवाद वर्चस्व राखले. तिसºया फेरीत तिचा सामना १०७वे रँकिंग असलेल्या जर्मनीच्या अँड्रिया पेटकोव्हिकवर विजय मिळवला.जागतिक रँकिंगमध्ये तिसºया स्थानावर असलेल्या गर्बाईन मुगुरुजाने फ्रान्सच्या फियोना फेरो हिचा ६-४, ६-३ असा पराभव केला. २५७वे रँकिंग असलेली फियोना स्पेनची अव्वल खेळाडू मुगुरुजा हिचा सामना करू शकली नाही. मुगुरुजाची गाठ तिसºया फेरीत अमेरिकेच्या समंथा स्टोसूर हिच्याशी पडेल.रशियाच्या मारिया शारापोवाला मात्र विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. ३०वे रँकिंग असलेल्या या खेळाडूला क्रोएशियाच्या ५०वे रँकिंग असलेल्या डोन्ना वेकीकने चांगलेच हैराण केले. मारियाने डोन्नावर ७-५, ६-४ असा विजय मिळविला.मारिया शारापोवा हिचापुढचा सामना चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना प्लिस्कोवा हिच्यासोबत होईल.डॉमनिक थिएमचा विजयदुसºया फेरीत डॉमनिक थिएमने ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासवर विजय मिळविला. फ्रेंच ओपनच्या या लढतीत अनुभवी थिएमने १९ वर्षांच्या स्टेफानोसवर ६-२,२-६,६-४,६-४ असा विजय मिळविला. या सत्रात थिएमने स्टेफानोसवर हार्डकोटवर झालेल्या दोन सामन्यांत विजय मिळविला होता. तर, स्टेफानोसने थिएमला बार्सिलोनात क्ले कोर्टवर पराभूत केले होते.