शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर चीनविरुद्ध पेसला न्याय मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:30 IST

अनुभवी लिएंडर पेसचे चीनविरुद्ध पुढील महिन्यात होणाºया डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. त्याची घोषणा निवड समिती उद्या करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उझबेकिस्तानविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते.

नवी दिल्ली - अनुभवी लिएंडर पेसचे चीनविरुद्ध पुढील महिन्यात होणाºया डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. त्याची घोषणा निवड समिती उद्या करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उझबेकिस्तानविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. तो बंगळुरू येथील वादानंतर संघात नव्हता. तेव्हा त्याला कर्णधार भूपतीने सुरुवातीला संघात स्थान दिले नव्हते. तथापि, एआयटीएच्या पदाधिका-यांनुसार पेस संघात असणे एशिया-ओशियाना ग्रुप एक लढतीत भारतासाठी लाभदायक ठरेल.एआयटीएच्या सूत्रांनुसार, ‘‘आम्ही कॅनडाविरुद्ध दुहेरी सामना गमवायला नको होता. जर आम्ही तो जिंकला असता तर आम्ही विश्व ग्रुपमध्ये स्थान बनवू शकलो असतो. अनुभवाबाबत पेसचे संघात बरेच योगदान असते.’’ कर्णधार भूपती आणि दुहेरी तज्ज्ञ रोहन बोपन्ना यांच्यासोबत पेसचे संबंध चांगले नाहीत, याविषयी छेडले असता पदाधिका-याने म्हटले, ‘‘हा वैयक्तिक लोकांचा नाही तर संघ आणि देशाचा विषय आहे. उद्या निवड समितीची बैठक होणार असून, निश्चितच पेसच्या नावावर विचार होणार आहे. तो डेव्हिस चषक विश्वविक्रमापासून फक्त एका विजयाने दूर आहे. त्याने देशासाठी खेळताना खूप योगदान दिले आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको.’’ पेसची निवड झाल्यास पूरव राजाला स्थान मिळणार नाही.जर पेस दुहेरीचा सामना जिंकल्यास त्याचा डेव्हिस चषकातील ४३ व्या दुहेरीतील विजय ठरेल आणि तो इटलीच्या निकोला पिट्रांगेली याला मागे टाकेल. पेसने दुबई एटीपी स्पर्धेत सुरेख कामगिरी केली. या बळावर त्याने अव्वल ५० जणांत पुनरागमन केले आहे आणि तो ४४ व्या स्थानावर आला आहे. बोपन्ना (२०) याच्यानंतर दिविज शरण (४४) हे भारताचे दुहेरीतील सर्वोच्च रँकिंगमधील खेळाडू आहेत आणि त्यांचे संघात पुनरागमन होण्याची  शक्यता आहे. एकेरीत युकी भांबरी, रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांची निवड जवळपास निश्चित आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाLeander Paesलिएंडर पेस