शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फेडररसाठी ‘नंबर वन’ची गरज नाही, स्पेनचा दिग्गज राफेल नदालने मांडले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:48 IST

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा स्टार रॉजर फेडरर यांच्यातील कोर्टवरील कट्टर प्रतिस्पर्धा जगजाहीर आहे. मात्र, त्याचवेळी हे दोघेही कोर्टबाहेर तितकेच चांगले मित्रही आहेत.

जोहान्सबर्ग : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा स्टार रॉजर फेडरर यांच्यातील कोर्टवरील कट्टर प्रतिस्पर्धा जगजाहीर आहे. मात्र, त्याचवेळी हे दोघेही कोर्टबाहेर तितकेच चांगले मित्रही आहेत. अलीकडेच फेडररने दुखापतीतून जबरदस्त पुनरागमन करताना पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत नदालला मागे टाकले. यानिमित्ताने नदालने फेडररचे अभिनंदन करतानाच, ‘फेडररचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ‘नंबर वन’ची आवश्यकता नाही,’ असे म्हटले.नदालने पुढे सांगितले की, ‘टेनिस विश्वात फेडरर कोणत्या स्थानी आहे, हे दाखविण्यासाठी त्याला अव्वल स्थानी येण्याची आवश्यकता नाही. त्याने टेनिसविश्वात जे काही मिळवलंय ते खूप कठीण असून तुम्ही यासाठी फक्त त्याचे अभिनंदन करू शकता.’ त्याचप्रमाणे, ‘क्रमवारी कधीच खोटे बोलतनाही.फेडररने गेल्या १२ महिन्यांमध्ये माझ्याहून अधिक चांगली कामगिरी केली आहे,’ असेही नदालने या वेळी स्पष्ट केले. गेल्याच आठवड्यात फेडररने एटीपी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. या वेळी त्याने अव्वल स्थान पटकावणारा सर्वांत बुजुर्ग खेळाडू अमेरिकेचा दिग्गज आंद्रे आगासीचा विक्रम मागे टाकला.याआधी २००४ साली सर्वप्रथम अव्वल स्थानी आलेल्या रॉजर फेडररने २०१२ सालानंतर कधीही अव्वल स्थान काबीज केले नव्हते. विशेष म्हणजे जानेवारी २०१७ सालामध्ये फेडररची जागतिक क्रमवारीमध्ये तब्बल १७व्या स्थानापर्यंत घसरण झाली होती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडरर