शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

फेडरर ठरला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू; सहाव्यांदा मारली बाजी; मानले नदालचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:50 IST

‘मी मोठ्या आवाजात ओरडून नदालचे आभार मानू इच्छितो. मागचे वर्ष अविश्वसनीय होते. त्याच्यासारख्या खेळाडूमुळे आपल्याकडे एक चांगला सामना होता. नदालमुळेच मी चांगला खेळाडू बनू शकलो'.

मोनॅको : दुखापतीतून सावरून गेल्या वर्षी जबरदस्त पुनरागमन केलेल्या दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केले. त्याचवेळी त्याने यंदा पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा लॉरियस क्रीडा पुरस्कारही पटकावला. विशेष म्हणजे ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू’ आणि वर्षातील ‘सर्वोत्तम पुनरागमन’ असे दोन पुरस्कार मिळविताना फेडररच्या एकूण लॉरियस पुरस्कारांची संख्या सहा झाली आहे. या वेळी, त्याने या यशाचे श्रेय आपला कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाल याला देतानाच ‘नदालमुळे मी चांगला खेळाडू बनू शकलो,’ असे मत व्यक्त केले.दखल घेण्याची बाब म्हणजे फेडरर आणि स्पेनचा दिग्गज राफेल नदाल या दोघांनीही दुखापतीचे चक्र भेदून जानेवारी २०१७ सालच्या आॅस्टेÑलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या वेळी फेडररने नदालचे आव्हान परतावून लावत तब्बल साडेचार वर्षांचा ग्रँडस्लॅम जेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. शिवाय या वर्षी त्याने विम्बल्डन स्पर्धाही जिंकली. दुसरीकडे, नदालने फ्रेंच आणि यूएस ओपन पटकावत आपले वर्चस्व राखले. यासह २०१७ वर्ष या दोन दिग्गजांनी गाजवले.पुरस्कार स्वीकारल्यानंतर फेडररने म्हटले की, ‘मी मोठ्याने नदालचे आभार मानू इच्छितो. मागचे वर्ष अविश्वसनीय होते. त्याच्यासारख्या खेळाडूमुळे आपल्याकडे एक चांगला सामना होता. नदालमुळेच मी चांगला खेळाडू बनू शकलो. तो अविश्वसनीय खेळाडू व तेवढाच शानदार मित्र आहे.’ त्याचवेळी, वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विलियम्सला प्रदान करण्यात आला. सेरेनाने पाचव्यांदा लॉरियस पुरस्कारावर नाव कोरले. तसेच अमेरिकेचे माजी दिग्गज धावपटू एडविन मोसेस यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.‘मी मोठ्या आवाजात ओरडून नदालचे आभार मानू इच्छितो. मागचे वर्ष अविश्वसनीय होते. त्याच्यासारख्या खेळाडूमुळे आपल्याकडे एक चांगला सामना होता. नदालमुळेच मी चांगला खेळाडू बनू शकलो'.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडरर