शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

जोकोविच अव्वल दहामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:38 IST

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने चौथ्यांदा विम्बलडन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना ताज्या एटीपी रँकिंगमध्ये अव्वल १० मध्ये पुनरागमन केले आहे.

लंडन : सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने चौथ्यांदा विम्बलडन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना ताज्या एटीपी रँकिंगमध्ये अव्वल १० मध्ये पुनरागमन केले आहे.अंतिम सामन्यात केव्हिन अँडरसनचा ६-२, ६-२, ७-६ (७-३) असा पराभव करताना विम्बलडनमध्ये पुरुष एकेरीत चौथ्यांदा विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचने ११ क्रमांकांनी झेप घेतली आहे. त्यामुळे तो रँकिंगमध्ये १० व्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी तो आठ महिन्यांपर्यंत अव्वल दहामधून बाहेर होता. दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनने तीन क्रमांकांनी झेप घेतली असून तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी जोकोविच आॅक्टोबर २०१७ मध्ये अव्वल दहामध्ये समाविष्ट होता. स्पेनचा राफेल नदाल (९३१० गुण) अव्वल स्थानावर कायम आहे. दुसºया क्रमांकावर रॉजर फेडरर (७०८०) आहे. अँडरसनने फेडररला मॅरेथॉन उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले होते.सेरेनाची झेपअमेरिकन दिग्गज खेळाडू सेरेना विलियम्सन विम्बलडन टेनिस स्पर्धेत उपविजेती राहिली. त्या बळावर तिने डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये १५३ स्थानांनी झेप घेतली असून, ती अव्वल ३० मध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली.सेरेना ने २८ व्या स्थानी झेप घेतली. मुलीच्या जन्मानंतर सेरेना पुनरागमन करताना चौथी स्पर्धा खेळत फायनलमध्ये धडक मारण्यात यशस्वी ठरली. अंतिम सामन्यात ती एंजलिक कर्बरविरुद्ध पराभूत झाली. कर्बरने सहा क्रमांकांनी झेप घेतली असून ती चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. सिमोना हालेप इंग्लंड क्लबमध्ये तिसºयाच फेरीत बाद झाली; परंतु त्यानंतरही ती अव्वल स्थानी कायम आहे.

टॅग्स :Tennisटेनिस