शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जोकोवीचचा दुसऱ्याच फेरीत पराभव, फ्रान्सच्या पेयरेचा सरळ विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:23 IST

आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच याला मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसºयाच फेरीत केवळ तासाभरात सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. फ्रान्सच्या बेनॉईट पेयरेने त्याचे आव्हान ६-३, ६-४ असे संपवले.

मियामी (अमेरिका) : आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच याला मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसºयाच फेरीत केवळ तासाभरात सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. फ्रान्सच्या बेनॉईट पेयरेने त्याचे आव्हान ६-३, ६-४ असे संपवले. यासह जोकोवीच हा अद्याप दुखापतीतून सावरलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा माजी नंबर वन खेळाडू २००७ नंतर प्रथमच सलग तीन सामने हरला आहे. जोकोवीचने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली असली तरी शुक्रवारी पेयरेविरुद्ध ६७ मिनिटांच्या लढतीत त्याची काही एक मात्रा चालली नाही.गेल्या सहा महिन्यांपासून जोकोवीच कोपराच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे तो तसा मैदानाबाहेरच आहे. २०१७ च्या विम्बल्डननंतर तो केवळ तीन स्पर्धा खेळला आहे मात्र या तीन्ही स्पर्धात तो अपयशी ठरला.जोकोवीचला नमविणाºया पेयरेचा पुढचा सामना आता फिलीप क्राजीनोवीकशी आहे. फिलीपने लियाम ब्रॉडीवर ६-३, ६-२ असा विजय मिळवला.वोझ्नियाकी मियामी ओपनच्या बाहेरआॅस्ट्रेलियन ओपनची विजेती कॅरोलिन वोज्नियाकी हिला डब्ल्यूटीए मियामी ओपनच्या दुसºया फेरीत मोनिका पुईगकडून ६-०,४-६,४-६ असा पराभव पत्करावा लागला. जगातील दुसºया क्रमांकाची खेळाडू वोज्नियाकी हिने पहिला सेट सहजपणे जिंकला. मात्र त्यानंतर ती आपली लय कायम राखू शकली नाही. पुईग हिने दुसºया मॅच पॉर्इंटवर फोरहॅण्डला विनर लगावत विजय मिळवला.व्हिनस विल्यम्स तिसºया फेरीतसात वेळची ग्रॅण्डस्लॅम विजेती खेळाडू व्हिनस विल्यम्स हिने क्वालिफायर नताली विखलियांत्सेवा हिला ७-५, ६-४ असे पराभूत करत डब्लुटीए मियामी ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. अमेरिकेच्या ३७ वर्षांच्या व्हिनस हिने पहिल्या सेट मध्ये रशियन खेळाडू नतालीविरोधात २-५ अशी पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर तिने सलग पाच गुण घेत सेट पटकावला. दुसºया सेटमध्येही नतालीने ३ -० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर व्हिनस हिने ६-४ असा सेट जिंकला आणि विजय मिळवला. आता तिचा सामना २९ वी मानांकित नेदरलॅण्डची खेळाडू किकि बर्टेस हिच्यासोबत होईल. तिने अमेरिकेच्या वारावरा लेपचेंकोला ५-७,७-६,६-१ असे पराभूत केले.

टॅग्स :Sportsक्रीडा