शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डेव्हिस चषक टेनिस : आयटीएफने पाकचे अपील फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:37 IST

भारताविरुद्धची लढत नूर सुल्तानमध्ये होणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध डेव्हिस कप लढत नूर सुल्तानमध्ये खेळेल. कारण आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) पाकिस्तानचे अपील फेटाळताना कजाखस्तानच्या राजधानीला या लढतीचे यजमानपद सोपविले. पाकिस्तान टेनिस महासंघाने या लढतीचे स्थान बदलण्याच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर भारतीय यात्रेकरू सुरक्षेबाबत कुठली चिंता न करता पाकिस्तानमध्ये येऊ शकतात, तर भारतीय संघ इस्लामाबादमध्ये सामना का खेळू शकत नाही.’आयटीएफच्या स्वतंत्र लवादाने ४ नोव्हेंबरला डेव्हिस चषक समितीतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. आयटीएफने म्हटले की, ‘पाकिस्तान टेनिस महासंघाने इस्लामाबादहून सामना अन्यत्र स्थानांतरित करण्याच्या डेव्हिस कप समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते. स्वतंत्र लवादाने १८ नोव्हेंबरला हे अपील फेटाळले.’ त्यात म्हटले गेले की, ‘पीटीएफने तटस्थ स्थळाचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे डेव्हिस कप नियमानुसार डेव्हिस कप समितीने नूर सुल्तान (पूर्वीचे अस्ताना) या शहराची यजमानपदासाठी निवड केली. येथे २९-३० नोव्हेंबरला ही लढत होईल.’सामने इडोअरमध्ये होतील कारण सध्या तेथे कडाक्याची थंडी आहे. भारताचे प्रशिक्षक जीशान अली म्हणाले,‘इनडोअरमध्ये खेळणे आमच्या खेळाडूंसाठी लाभदायक आहे. हा निर्णय आमच्यासाठी अनुकूल असेल. आमचे खेळाडू ग्रासकोर्टवर खेळू शकत नाही, असे नाही, पण हार्डकोटवर खेळणे त्यांना अधिक आवडते. तेथे सध्या खूप थंडी असेल. त्यामुळे आम्ही बंदिस्त स्टेडियममध्ये खेळू.’ (वृत्तसंस्था)लढत २९-३० नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार ही लढत सप्टेंबरमध्ये होणार होती, पण उभय देशांदरम्यानच्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करताना भारताने लढत तटस्थ स्थळी आयोजित करण्याची मागणी केली होती. भारताने या लढतीसाठी मजबूत संघ जाहीर केला होता. कारण पाकिस्तानला जाण्यास नकार देणारे आघाडीचे सर्व खेळाडू तटस्थ स्थळावर खेळण्यास तयार आहेत.भारताचे नेतृत्व सुमित नागल व रामकुमार रामनाथन करतील. लिएंडर पेस व जीवन नेदुचेझियान दुहेरीत खेळतील. रोहन बोपन्नाने खांद्याच्या दुखापतीमुळे लढतीतून माघार घेतली. जीशान म्हणाले की, ‘बोपन्नाच्या माघारीनंतर दुहेरीच्या तीन स्पेशालिस्ट खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय समजदारीचा होता, हे सिद्ध झाले आहे. स्पेशालिस्ट खेळाडूंना राखीव म्हणून घेऊन जाण्याचा निर्णय योग्यच होता. बोपन्नाच्या स्थानी आता जीवन खेळेल. आम्ही अंतिम पाचची घोषणा करू शकत नाही, पण जीवन खेळेल. आम्हाला रोहनची उणीव भासेल.’