शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

डेव्हिस चषक : रामकुमार जिंकला, युकी पराभूत भारत-कॅनडा १-१ ने बरोबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:23 IST

युवा टेनिसपटू युकी भांबरीला अथक प्रयत्नांनंतरही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, रामकुमार रामनाथनचा विजय भारतासाठी दिलासा देणारा ठरला.

एडमंटन : युवा टेनिसपटू युकी भांबरीला अथक प्रयत्नांनंतरही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, रामकुमार रामनाथनचा विजय भारतासाठी दिलासा देणारा ठरला. त्याच्या विजयानंतर भारताने कॅनडाविरुद्ध डेव्हिस चषक विश्व गट प्लेआॅफ सामन्यात पहिल्या दिवशी १-१ अशी बरोबरी साधली.जगातील ५१ व्या क्रमांकावर असलेल्या डेनिस शापोवालोवविरुद्ध दोन सेट गमावल्यानंतरही भारताच्या युकी भांबरीने विजयासाठी संघर्ष सुरूच ठेवला होता. मात्र, त्याला ६-७, ४-६, ७-६, ६-४, १-६ ने पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे, १५४ व्या क्रमांकाचा रामकुमार याने ब्रेडेने शनूर याचा पहिल्या एकेरीतील सामन्यात ५-७, ७-६, ७-५, ७-५ ने पराभव केला. हा सामना तीन तास १६ मिनिटे चालला. शनूर याचा पराभव करीत रामकुमार याने डेव्हिस चषकातील सत्रात आपले विजयी अभियान कायम राखले. दमदार सर्व्हिस ही त्याची ताकद आहे. मात्र, फटक्यातील गती कमी होती.दुसरीकडे, युकीने आपल्या खेळाने सिद्ध करून दाखवले, की त्याने २२ व्या क्रमांकाचा गाएल मोफिल्स याच्यावर मिळवलेला विजय साधा नव्हता. तो अव्वल खेळाडूंना टक्कर देण्यास सक्षम आहे. सामन्यानंतर भारताचा कर्णधारा महेश भूपती म्हणाला, की मुलांनी चांगला खेळ केला. राम याने गमावलेला सामना जिंकून दिला. युकीसुद्धा विजयाच्या समीप होता. आम्ही अशाच पद्धतीने खेळ केला तर लक्ष्य चांगले असेल. या पराभवाचे दु:ख युकीला काही वेळापुरते राहिले असेल; परंतु त्याने शापोवालोव याच्यावर दबाव आणला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा