शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चायना ओपन बॅडमिंटन : सायना, सिंधू, प्रणॉय पुढच्या फेरीत; लीन डॅन पहिल्याच फेरीत पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:00 IST

पाचवेळचा जागतिक आणि दोन वेळचा आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लीन डॅनचा चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक पराभव झाला.

फुजोउ : पाचवेळचा जागतिक आणि दोन वेळचा आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लीन डॅनचा चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक पराभव झाला. दखल घेण्याची बाब म्हणजे तब्बल ७ मॅच पॉइंट वाचवल्यानंतर लीनला पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला. इंडोनेशियाचा जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानी असलेल्या जोनाथन ख्रिस्टी याने लीनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. भारतीयांमध्ये सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि एच. एस प्रणॉयने अपेक्षित कामगिरी करताना विजयी सलामी दिली.जोनाथनने दोन गेमपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात खळबळ माजवताना बलाढ्य लीनचे २१-१९, २१-१६ असे आव्हान संपुष्टात आणले. दरम्यान, या पराभवानंतर लवकर हा दिग्गज खेळाडू आपल्या निवृत्तीची घोषणा करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाचवेळा चायना ओपनचे जेतेपद उंचावलेल्या अनुभवी लीनकडून या सामन्यात अनेक चुका झाल्या. याचा पुरेपूर फायदा घेताना जोनाथनने ४२ मिनिटांमध्येच लीनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. मलेशियाच्या ली चोंग वेई याने मात्र सहज विजयी सलामी देत तैवानच्या सुह जेनहाओ याचा २१-५, २१-७ असा फडशा पाडला.भारतीयांमध्ये सायनाने अमेरिकेच्या बेइवान झैंग हिला केवळ ३० मिनिटांमध्ये २१-१२, २१-१३ असे नमवून शानदार आगेकूच केली. पुढील फेरीत सायनापुढे पाचव्या मानांकीत अकाने यामागुची हिचे तगडे आव्हान असेल. स्टार शटलर सिंधूला विजयी सलामी देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागली. ५९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यातसिंधूने जपानच्या १३ क्रमांकाच्या सयाका सातोला २४-२२, २३-२१ असे नमवले. पुरुषांच्या गटात भारतीय खेळाडू प्रणॉयने पिछाडीवरुनबाजी मारताना कोरियाच्या ली डोंग क्युन याला १८-२१, २१-१६, २१-१९ नमविले़ (वृत्तसंस्था)दुहेरीतही भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष जोडीला पहिल्या फेरीतून आपला गाशा गुंडाळावा लागला. चीनच्या चेंग ल्यू - नान झँग यांनी भारतीय जोडीचा २१-१३, २१-१३ असा सरळ दोन गेममध्ये सहज पराभव केला.