शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस : चंगशी होणार ‘फेड’ची जंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:27 IST

स्टार खेळाडू राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच स्पर्धेबाहेर पडले. आता संपूर्ण टेनिस जगताचे लक्ष असेल ते रॉजर फेडररवर. स्वित्झर्लंडच्या या महान खेळाडूची पावले २०व्या ग्रॅण्डस्लॅमकडे वळत आहेत. आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आता फेडररचा सामना ‘जायंट किलर’ चंग हियोनविरुद्ध होईल. निश्चितच, चंगविरुद्ध ही फेडररची जंगच असेल.

मेलबर्न : स्टार खेळाडू राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच स्पर्धेबाहेर पडले. आता संपूर्ण टेनिस जगताचे लक्ष असेल ते रॉजर फेडररवर. स्वित्झर्लंडच्या या महान खेळाडूची पावले २०व्या ग्रॅण्डस्लॅमकडे वळत आहेत. आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आता फेडररचा सामना ‘जायंट किलर’ चंग हियोनविरुद्ध होईल. निश्चितच, चंगविरुद्ध ही फेडररची जंगच असेल. महिला गटात, जर्मनी केर्बर आणि रोमानियाच्या हालेप यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.फेडररने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी टामस बर्डिच याचा ७-६ (७-१), ६-३, ६-४ ने पराभव करत १४ व्यांदा मेलबर्न पार्कच्या अंतिम चारमध्ये जागा मिळवली. दक्षिण कोरियाच्या चंग याने सेंडग्रेनचा ६-४, ७-६ (७-५), ६-३ ने पराभव केला. दोन वर्षांपूर्वी किताब जिंकणाºया कर्बर हिने अमेरिकेच्या मेडिसन कीसचा ६-१, ६-२ ने सरळ पराभव केला. आता तिचा सामना विश्वात नंबर वन असलेल्या हालेपविरुद्ध होईल.मी खूप आनंदी आहे. मी पहिल्याच सेटमध्ये विजय मिळण्यात यशस्वी ठरलो. सामन्याच्या शेवटी हे महत्त्वपूर्ण ठरले. नवे नाव पाहून खूप चांगले वाटते. तो मला बºयाचदा नोवाक जोकाविचची आठवण करून देतो.- रॉजर फेडररनदाल तीन आठवडे कोर्टबाहेर!-1जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला स्पेनचा राफेल नदाल दुखापतग्रस्त आहे. त्याला तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात येईल, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. नदालला आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेपूर्वीसुद्धा तो फिट नव्हता. स्पर्धेत पुन्हा तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला सामना अर्ध्यावर सोडावा लागला होता.2क्रोएशियाच्या मारिन सिलीचच्या विरोधात खेळताना पाचव्या सेटच्या वेळी त्याच्या उजव्या पायातील मांसपेशी ताणल्या गेल्या. त्याला लगेच इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्कॅनिंगही करण्यात आले. एमआरआयमध्ये त्याच्या उजव्या पायामध्ये दुखापतीचे निदान झाले आहे.3त्यामुळे तो स्पेनला पोहोचल्यानंतर काही काळ विश्रांती घेईल. त्यानंतर फिजिओथेरपी सुरू करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. तो आगामी एकापुल्को, इंडियन वेल्स आणि मियामी येथे होणाºया स्पर्धा खेळू शकेल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला.बोपन्ना-बाबोस जोडीचा विजय-भारताची शेवटची आशा बनलेल्या रोहन बोपन्नाने हंगेरीच्या तिमिया बाबोससोबत खेळताना उपांत्य फेरीत धडक दिली आहे. या जोडीने कोलंबियाच्या जुआन सेबेश्चियन कबाल आणि अमेरिकेच्या अबिगेल स्पीयर्स या जोडीचा ६-४, ७-६ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना एक तास १५ मिनिटे चालला. सामना चुरशीचा झाला; कारण विजयासाठी रोहन बोपन्नाला मेहनत घ्यावी लागली. असे असले तरी बोपन्ना-बाबोस जोडी सतर्क होती.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररAustralian Openऑस्ट्रेलियन ओपन