शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एटीपी फायनल्स टेनिस: थिएम-सिटसिपास जेतेपदासाठी भिडणार; गतविजेता झ्वेरेव गारद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 01:08 IST

दोन्ही खेळाडूंकडे पहिल्या जेतेपदाची संधी

लंडन : डॉमनिक थिएमने पुन्हा एकदा अनपेक्षित निकालाची नोंद करत गतविजेत्या अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव केला आणि एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जेतेपदासाठी तो स्टेफानोस सिटसिपासविरुद्ध भिडेल. सिटसिपासनेही धक्कादायक निकाल लावताना दिग्गज रॉजर फेडरर याला पराभूत करत अंतिम फेरी गाठली.शनिवारी रात्री आॅस्ट्रियाच्या थिएमने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारत जर्मनीच्या झ्वेरेवला ७-५, ६-३ असा धक्का दिला. यासह थिएमने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे, थिएम चौथ्यांदा एटीपी फायनल्स स्पर्धा खेळतोय आणि गेल्या तीन सत्रांत तो केवळ तीन सामने जिंकू शकला. यामुळे कधीही त्याला साखळी फेरीतून आगेकूच करता आली नव्हती. यंदा मात्र त्याने मोठी सुधारणा करताना सलामीला फेडररला नमविण्याचा पराक्रम केला होता. तसेच उपांत्य फेरीत संभाव्य विजेत्या झ्वेरेवला नमविल्याने आता त्याच्या पहिल्या जेतेपदाच्या आशा अधिक उंचावल्या आहेत.दुसरीकडे, सिटसिपासने शानदार खेळ करत फेडररला ६-३, ६-४ असे नमवत पहिल्याच प्रयत्नात स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सिटसिपास फेडररहून १७ वर्षे वयाने लहान असून त्याच्या विजयामुळे फेडररच्या सातव्या एटीपी फायनल्स जेतेपदाचे स्वप्न भंगले. (वृत्तसंस्था)