Swarda Thigale disguises herself as a boy in pyaar ke papad | 'या' कारणामुळे सेटवर स्वरदा ठिगळेला ओळखले नाही कुणी

'या' कारणामुळे सेटवर स्वरदा ठिगळेला ओळखले नाही कुणी

ठळक मुद्दे'प्यार के पापड’ मालिकेत स्वरदा शिविकाची भूमिका साकारत आहे

सोज्वळ सौंदर्य, भावदर्शी चेहरा यामुळं अभिनेत्री स्वरदा ठिगळेला रसिकांची पसंती मिळत आहे.अल्पावधीतच तिने आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली असून आता रसिक तिच्या भूमिकेप्रमाणेच तिच्या सोज्वळ सौदर्यांच्याही प्रेमात पडत आहेत.सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. स्टार भारतवरील ‘प्यार के पापड’ मालिकेत स्वरदा शिविकाची भूमिका साकारत आहे. या शोमधील तिच्या भूमिकेसाठी तिने अतिशय साधा पारंपारिक वेशही अतिशय उत्तम आणि सुंदर पद्धतीने कॅरी केला आहे. या मालिकेतील  भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे यासाठी स्वरदाने मुलाचा वेश परिधान केला होता. मुलाच्या वेशात जेव्हा स्वरदा व्हॅनिटीच्या बाहेर पडली त्यावेळी तिला सेटवरील कलाकारांनी देखील ओळखले नाही.

याबाबत स्वरदा म्हणाली, “मला आव्हान स्वीकारायला आवडतात आणि मी काहीतरी मी प्रथमच केले असून ते करताना मला खूप मजा आली. मला आनंद आहे की सगळे काही नीट पार पडले आणि सेटवरील लोकांनी जेव्हा मला  सुरूवातीला ओळखले नाही तेव्हा तर मला खूपच गमत वाटली.” प्यार के पापड ही मालिका भावना, हास्य, प्रेम यांचा मिलाफ असून नेहमीच मालिकांपेक्षा चौकटीबाहेरची ठरली आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Swarda Thigale disguises herself as a boy in pyaar ke papad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.