टीआरपीच्या रेसमध्ये तुला पाहते रे ही मालिका तिसऱ्या स्थानी, जाणून घ्या कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 13:24 IST2018-09-29T13:15:52+5:302018-09-29T13:24:43+5:30

बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाने या आठवड्यात कोणत्या मालिका प्रेक्षकांनी अधिक पाहिल्या याचा रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टनुसार तुला पाहते रे ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे.

Mazhya Navryachi Bayko rules the TRP chart; Tula Pahate Re secures its position to the top five shows | टीआरपीच्या रेसमध्ये तुला पाहते रे ही मालिका तिसऱ्या स्थानी, जाणून घ्या कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर

टीआरपीच्या रेसमध्ये तुला पाहते रे ही मालिका तिसऱ्या स्थानी, जाणून घ्या कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर


छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. यात 'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. ही मालिका सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाने या आठवड्यात कोणत्या मालिका प्रेक्षकांनी अधिक पाहिल्या याचा रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टनुसार तुला पाहते रे ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे.

पहिल्या स्थानावर झी मराठी वरीलच माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आहे. अभिजीत खांडकेकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत होती. पण आता तिने या मालिकेला रामराम ठोकला असून तिची जागा इशा केसकरने घेतली आहे. रसिकाने मालिका सोडल्यानंतर त्याचा या मालिकेच्या टीआरपीवर परिणाम होईल असे सगळ्यांना वाटले होते. पण रसिकाच्या एक्झिटनंतरही ही मालिका प्रेक्षकांच्या सगळ्यात पसंतीची मालिका आहे. गेल्या कित्येक आठवड्यापासून या रिपोर्टमध्ये माझ्य नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर आहे. 

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या क्रमांकावर राणा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका आहे. या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरची मुख्य भूमिका आहे. चौथ्या स्थानावर चला हवा येऊ द्या आणि पाचव्या क्रमांकावर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे संभाजी राजांची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत. 
 

Web Title: Mazhya Navryachi Bayko rules the TRP chart; Tula Pahate Re secures its position to the top five shows