तुला पाहते रे घसरली तिसऱ्या क्रमांकावर, ही मालिका ठरली अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 12:53 IST2018-12-29T12:52:26+5:302018-12-29T12:53:57+5:30

गेल्या कित्येक आठवड्यापासून दुसऱ्या क्रमांकावर तुला पाहाते रे ही मालिका होती. एवढेच नव्हे तर गेल्या महिन्यात ही मालिका पहिल्या क्रमांकावर आली होती. पण ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.

Mazhya navryachi bayko is no one in barc ratings | तुला पाहते रे घसरली तिसऱ्या क्रमांकावर, ही मालिका ठरली अव्वल

तुला पाहते रे घसरली तिसऱ्या क्रमांकावर, ही मालिका ठरली अव्वल

ठळक मुद्देमाझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे तर णा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात झी मराठीवर झालेला उत्सव आनंदाचा हा कार्यक्रम पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या कित्येक आठवड्यापासून चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पहिल्या पाचमध्ये होता. पण या आठवड्यात चला हवा येऊ द्याला पहिल्या पाचमध्ये जागा बनवता आलेली नाहीये.

माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या कित्येक आठवड्यापासून या रिपोर्टमध्ये माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर आहे. 

राणा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या कित्येक आठवड्यापासून दुसऱ्या क्रमांकावर तुला पाहाते रे ही मालिका होती. एवढेच नव्हे तर गेल्या महिन्यात ही मालिका पहिल्या क्रमांकावर आली होती. पण ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. या मालिकेतील सुबोध आणि गायत्रीच्या केमिस्ट्रीची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. ही जोडी आणि त्यांच्यातील प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. त्या दोघांचे लग्न कधी होणार याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. पण तरीही या कार्यक्रमाची लोकप्रियता कमी झालेली दिसून येत आहे. चौथ्या क्रमांकावर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे.

विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत. गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या पहिल्या पाच भागात झी वाहिनीवरीलच या मालिकांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. 

Web Title: Mazhya navryachi bayko is no one in barc ratings