अप्पीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जुन घेणार पुढाकार! 'घरात बायको, बाहेर बॉस' कसा असेल हा नवा प्रवास?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 07:00 AM2022-12-31T07:00:00+5:302022-12-31T07:00:07+5:30

अप्पी अर्जुनचं लग्न झाल्यानंतर मालिकेत लवकरच एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Appi Aamchi Collector episodic | अप्पीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जुन घेणार पुढाकार! 'घरात बायको, बाहेर बॉस' कसा असेल हा नवा प्रवास?

अप्पीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जुन घेणार पुढाकार! 'घरात बायको, बाहेर बॉस' कसा असेल हा नवा प्रवास?

googlenewsNext

अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर आली आहे.

 मालिकेत रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. ही  मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. अप्पी अर्जुनचं लग्न झाल्यानंतर मालिकेत लवकरच एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो म्हणजे अर्जुन अप्पीला कलेक्टर बनवण्यासाठी तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहून तिला प्रोत्सहन देणार आहे, आणि त्याचा ठाम विश्वास आहे अप्पी नक्की कलेक्टर बनणार.


 
या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरतोय, येणाऱ्या काही भागात आपण पाहणार आहोत अप्पी कलेक्टर झाल्यावर 'घरात बायको, बाहेर बॉस' कसा असेल हा नवा प्रवास? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Web Title: Appi Aamchi Collector episodic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.