शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉइस कॉलिंग आणि 30 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Zebronics ZEB-FIT7220CH स्मार्टवॉच सादर 

By सिद्धेश जाधव | Updated: September 21, 2021 11:55 IST

Zebronics ZEB-FIT7220CH Price in India: व्हॉइस कॉलिंग फिचरसह Zebronics ZEB-FIT7220CH स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आला आहे.  

Zebronics ZEB-FIT7220CH स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टवॉचची खासियत म्हणजे या वॉचच्या माध्यमातून कॉल करता आणि उचलता येतील. यासाठी इनबिल्ट स्पिकर आणि माईक देण्यात आला आहे. त्याचबरोबर Zebronics ZEB-FIT7220C स्मार्टवॉचमध्ये SpO2 मॉनिटर, ब्लड प्रेशर मॉनिटर आणि हार्ट रेट मॉनिटर इत्यादी सेन्सर देखील मिळतात.  

Zebronics ZEB-FIT7220CH ची किंमत 

Zebronics ZEB-FIT7220CH ची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत Amazon इंडियावर दिसत आहे, परंतु कंपनीच्या वेबसाईटवर हा वॉच 7,499 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. हा स्मार्टवॉच ब्लॅक, ब्लू, गोल्ड आणि मेटॅलिक सिल्वर. 

Zebronics ZEB-FIT7220CH चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स  

Zebronics ZEB-FIT7220CH मध्ये 1.75 इंचाचा 2.5D कर्व्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे. या वॉचमध्ये व्हॉइस कॉलिंगसाठी इनबिल्ट स्पीकर आणि माईक मिळतो. इतकेच नव्हे तर कॉलर आयडी, कॉल रिजेक्ट, रिसेन्ड कॉल आणि एसएमएस असे फीचर्स देखील या वॉचमधून वापरता येतील. 100 पेक्षा जास्त कस्टमाइज्ड वॉच फेससह येणाऱ्या या वॉचच्या मदतीने युजर स्मार्टफोनमधील म्यूजिक आणि कॅमेरा कंट्रोल करू शकतात. गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध असलेल्या ZEB-FIT 20 सीरीज अ‍ॅपच्या माध्यमातून या स्मार्टवॉचच्या इतर अनेक फीचर्सचा वापर करता येईल.  

Zebronics ZEB-FIT7220CH मध्ये वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, स्किपिंग, बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि फुटबॉल इत्यादी सात स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. IP67 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह येणार हा वॉच स्टेप्स, कॅलरी बर्न आणि डिस्टन्स कव्हर ट्रॅक करू शकतो. यात पेडोमीटर, कॅलरी काउंटर, डिस्टन्स ट्रॅकर, सेडेंटरी रिमायंडर आणि स्लीप मॉनिटर असे फिचर देखील देण्यात आले आहेत. 1.5 ते 2 तासांत चार्ज होणारा आणि 210mAh बॅटरी असलेला Zebronics ZEB-FIT7220CH सिंगल चार्जमध्ये 30 दिवसांचा स्टँडबाय टाइम देतो. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडamazonअ‍ॅमेझॉन