शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

ओप्पो एफ5ची युथ एडिशन

By शेखर पाटील | Updated: December 8, 2017 11:25 IST

अलीकडेच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आलेल्या ओप्पो ए५ या स्मार्टफोनची युथ या नावाने नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्यात आली आहे.

अलीकडेच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आलेल्या ओप्पो ए५ या स्मार्टफोनची युथ या नावाने नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्यात आली आहे. ओप्पो एफ५ या स्मार्टफोनच्या मिनी आवृत्तीच्या स्वरूपात युथ एडिशन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. अर्थात यामध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा थोडे कमी फिचर्स असतील. यातील डिस्प्ले हा ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२१६० बाय १०८० पिक्सल्स), १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि कडा विरहीत (बेझेललेस) या प्रकारातील असेल. यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी२३ हा प्रोसेसर देण्यात आला आहे.

याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने यातील स्टोअरेज वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात मेटलबॉडी देण्यात आली असून मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. आधीच्या मॉडेलपेक्षा ओप्पो एफ५च्या युथ एडिशनमध्ये कॅमेरेदेखील थोडे वेगळे देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये एफ/२.० अपार्चरयुक्त १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात आर्टीफिशियल इंटिलेजियन्सने युक्त असणारे एआय ब्युटी रिकग्नेशन हे फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने हा कॅमेरा सेल्फी घेणार्‍या युजरचे वय, त्वचेचा रंग, लिंग आदी बाबींना ओळखू शकतो. यात सेल्फी प्रतिमांना बोके इफेक्टदेखील देण्याची सुविधा आहे. तर यातील मुख्य कॅमेरा हा एफ/२.२ अपार्चर, फेज डिटेक्शन ऑटो-फोकस व एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल.

यामध्ये जिओ-टॅगींग, एचडीआर, पॅनोरामा, टच फोकस, फेस डिटेक्शन आदी फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. व्हीओओसी या फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाचा सपार्ट असणारी ३२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी यात आहे. ओप्पो एफ ५ युथ एडिशन या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्स आदी फिचर्सही असतील. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर आधारित कलर ओएस ३.२ वर चालणारा असेल. हे मॉडेल १६,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना आजपासून खरेदी करता येणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल