शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शाओमी मी ५ एक्सची घोषणा

By शेखर पाटील | Updated: July 28, 2017 20:13 IST

शाओमी कंपनीने ड्युअल रिअर कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा मी ५ एक्स हा स्मार्टफोन जाहीर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

शाओमी कंपनीने ड्युअल रिअर कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा मी ५ एक्स हा स्मार्टफोन जाहीर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

शाओमी मी ५ एक्स या मॉडेलची खासियत म्हणजे हा मीयुआय ९ या ऑपरेटींग प्रणालीवर चालणारा पहिला स्मार्टफोन आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. शाओमी मी ५ एक्स या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १०८० बाय १९२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. 

शाओमी मी ५ एक्स या स्मार्टफोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील पहिला कॅमेरा हा एफ/२.२ अपार्चर व १.२५ मायक्रॉन पिक्सलसह १२ मेगापिक्सल्सचा असेल. तर दुसरा एफ/२.६ अपार्चर, १.२५ मायक्रॉन पिक्सलसह १२ मेगापिक्सल्सचा टेलिफोटो कॅमेरा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला असून यात रिअल-टाईम ब्युटिफिकेशनची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

शाओमी मी ५ एक्स या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई तसेच फोर-जी नेटवर्क सपोर्ट असेल. याशिवाय, यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, युएसबी टाईप-सी पोर्ट, हेडफोन जॅक आदी सुविधा असतील. याशिवाय यात अँबियंट लाईट, प्रॉक्झीमिटी, अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर, इन्फ्रारेड आदी सेन्सर्स असतील. ब्लॅक, गोल्ड आणि पिंक या तीन आकर्षक रंगांमध्ये हे मॉडेल पहिल्यांदा चीनमध्ये उपलब्ध करण्यात आले असून याचे रूपयातील मूल्य सुमारे १४ हजारांच्या आसपास आहे. येत्या काही महिन्यात हा स्मार्टफोन भारतात लाँच होऊ शकतो.