शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

फेक न्यूजवर बसणार आळा; X ने भारतात लॉन्च केले Community Notes फिचर, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:06 IST

X (Twitter) ने आजपासून भारतात Community Notes फिचर सुरू केले आहे.

Twitter Communiti Notes Feature: मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट X (पूर्वीचे Twitter) ने भारतात कम्युनिटी नोट्स (Community Notes) फिचर सुरू केले आहे. खुद्द Xचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ही माहिती दिली. या फिरमध्ये युजरला X वर कम्युनिटी पोस्ट लिहिण्याची आणि रेट करण्याची सुविधा मिळते. भारतापूर्वी हे फीचर डिसेंबर 2022 मध्येच जागतिक स्तरावर रिलीज करण्यात आले होते. मात्र, आता ते भारतात लॉन्च करण्यात आले आहे.

ट्विटरने हे फिचर फॅक्ट चेकिंग प्रोग्राम अंतर्गत आणले आहे. लोकसभा निवडणुकीच्याच्या पार्श्वभूमीवर हे फिचर आल्याने त्याला जास्त महत्व मिळाले आहे. निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर अनेकदा फेक न्यूज व्हायरल होतात. ट्विटरवर अशा खोट्या बातम्या पसरू नयेत, यासाठीच हे कम्युनिटी नोट्स फिचर सुरू करण्यात आले आहे. इलॉन मस्क यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत X (ट्विटर) हँडलद्वारे हे फिचर भारतात लॉन्च झाल्याची माहिती दिली. यासोबतच मस्क यांनी सांगितले की, भारतासोबतच आता 69 देशांमध्ये कम्युनिटी नोट्स फिचर उपलब्ध असेल.

कम्युनिटी नोट्सद्वारे फेक न्यूजला आळा घालणारभारतातील कॉट्रीब्यूटर्स आज (गुरुवार) पासून कम्युनिटी नोट्स जॉईन करु शकतील. याद्वारे भारतीय युजर्सना  प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टच्या फॅक्ट चेंकिंगमध्ये भाग घेता येईल. याद्वारे ट्विटर युजर्सना योग्य माहिती पुरवली जाईल. X ने विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना नोट्स ऑर्थर म्हणून योगदान देण्यासाठी आमंत्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी X ने कम्युनिटी नोट्स पोस्ट करणे सुरू केल्यामुळे चुकीच्या बातम्या पसरण्यापासून रोखता येतील.

Community Notesमध्ये कसे सामील व्हावे1. X च्या Community Notes फिचरमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला (https://twitter.com/i/flow/join-birdwatch) वर जावे लागेल.2. यानंतर Join Community Notes वर क्लिक करा.3. आता तुमच्यासमोर काही अटी असतील, त्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही कम्युनिटी नोट्स फीचर वापरू शकता.4. सर्व अटी पूर्ण केल्यानंतर, Got it वर क्लिक करा.5. यानंतर तुम्ही कम्युनिटी नोट कोणत्याही पोस्टसह शेअर करू शकता.

टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्कtechnologyतंत्रज्ञानFake Newsफेक न्यूज