शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:24 IST

एमआयटीच्या शास्त्रज्ञांनी ९८ वर्षापूर्वीच्या आइन्स्टाईन यांनी केलेला दावा खोडून काढला आहे.

एमआयटीच्या शास्त्रज्ञांनी ९८ वर्षापासून सुरू असलेल्या एका वादावर पडदा टाकला आहे. ९८ वर्षापूर्वी १९२७ मध्ये, दोन महान शास्त्रज्ञ, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि नील्स बोहर यांच्यामध्ये प्रकाश म्हणजे काय? कधी तो कणांसारखा, तर कधी लाटांसारखा असतो यावर वादविवाद होता. यावर आता पडदा पडला आहे. एआयटीच्या शास्त्रज्ञांनी आइन्स्टाईन यांचा दावा खोडून काढला आहे. 

ज्यावेळी प्रकाशाचे कण म्हणजेच फोटॉन दोन छिद्रे म्हणजेच दुहेरी स्लिटमधून जातात तेव्हा ते एक खुणा सोडतात. असा दावा आइन्स्टाईन  यांनी केला होता. हा दावा खोटा असल्याचा आता ९८ वर्षानंतर एमआयटीच्या शास्त्राज्ञांनी सिद्ध केले आहे.

'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले

डबल स्लिट प्रयोग काय आहे?

डबल स्लिट प्रयोग प्रयोग हा भौतिकशास्त्राच्या जगातला एक प्रसिद्ध प्रयोग आहे. हे प्रकाश आणि पदार्थ कण आणि लाटा दोन्हींसारखे व्यवहार करतात हे समजून घेण्यास हा प्रयोग मदत करतो. यामध्ये, एका पडद्यावर दोन लहान छिद्रे असतात, यातून प्रकाश किंवा कण जातात आणि दुसऱ्या बाजूला एक नमुना तयार होतो. जर प्रकाश फक्त एक कण असता तर दोन सरळ रेषा तयार झाल्या असत्या. परंतु यामध्ये, एक लाटासारखा नमुना तयार होतो, यातून प्रकाशाचा व्यवहार किती अद्वितीय असल्याचे दिसते.

एमआयटीने काय सांगितले?

हा प्रयोग अधिक अचूक करण्यासाठी, एमआयटी टीमने अल्ट्राकोल्ड अणू  आणि सिंगल फोटॉन वापरले. हा आजपर्यंतचा सर्वात अचूक डबल स्लिट प्रयोग मानला जातो. ज्यावेळी फोटॉन स्लिटमधून जातात तेव्हा ते कोणत्याही खुणा सोडत नाहीत, असे या प्रयोगातून स्पष्टपणे दिसून आले. आइन्स्टाईन  यांनी केलेल्या दाव्याच्या उलट हे आहे. 

आइन्स्टाईन आणि बोहर यांच्यातील वादविवाद काय होता?

१९२७ मध्ये, क्वांटम मेकॅनिक्सच्या जगात गोष्टी कशा कार्य करतात यावर आइन्स्टाईन आणि बोहर यांच्यात खोलवर वादविवाद झाला. आइन्स्टाईन यांना वाटले की क्वांटम सिद्धांत पूर्णपणे बरोबर नाही आणि त्यात निश्चितच काही लपलेली माहिती आहे. दुसरीकडे, बोहर म्हणाले की, क्वांटम जगातील गोष्टी अनिश्चित आहेत आणि आपण त्यांचे वर्तन पूर्णपणे समजू शकत नाही. एमआयटीचा हा नवीन प्रयोग बोहर यांच्या कल्पनांना आणखी बळकटी देतो.

याचा अर्थ काय?

या शोधामुळे आपल्याला क्वांटम भौतिकशास्त्र अधिक खोलवर समजण्यास मदत होईल. 'निसर्गाचे नियम आपण विचार केला त्यापेक्षा खूपच गुंतागुंतीचे आणि गूढ आहेत' हे यातून आपल्याला समजते. या प्रयोगामुळे क्वांटम संगणन, क्रिप्टोग्राफी आणि इतर तंत्रज्ञानात नवीन शक्यताही उघडू शकतात.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानscienceविज्ञान