शहरं
Join us  
Trending Stories
1
तात्पुरता दिलासा की क्लीन चिट? ससूनच्या चार पानी अहवालात दीनानाथ रुग्णालय, डॉ. घैसास यांच्यावर ठपका नाही
2
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
3
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
4
आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...
5
IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...
6
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
7
बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण
8
आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
9
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
10
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
11
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने शोधला एलियन्सचं वास्तव्य असलेला ग्रह, संशोधनानंतर केला दावा
12
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
13
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
14
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
15
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळालेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
16
कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना
17
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
18
स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
19
५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
20
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”

स्क्रीनशॉट अर्थात स्क्रीनचा फोटो म्हणजे काय ?

By अनिल भापकर | Updated: March 19, 2018 13:25 IST

स्क्रीनशॉट म्हणजे स्क्रीनचा घेतलेला फोटो. मग तो स्क्रीन तुमच्या कॉम्प्युटरचा असेल किंवा लॅपटॉपचा असेल किंवा हल्लीच्या टॅबलेट अथवा स्मार्ट फोनचाही असू शकतो. स्क्रीनशॉट अथवा स्क्रीनचा फोटो घेण्यासाठी कुठल्याही कॅमेऱ्याची गरज पडत नाही, तर कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्टफोन मध्येच काही युक्त्या वापरून तुमच्या डिव्हाईसचा स्क्रीनशॉट घेता येतो.

ठळक मुद्देहल्लीचा जमाना हा आॅनलाईनचा आहे. म्हणजे आॅनलाईन शॉपिंग, आॅनलाईन बँकिंग, आॅनलाईन आयटी रिटर्न आदी सर्व गोष्टी आॅनलाईन करताना एक ट्रान्झॅक्शन नंबर जनरेट होतो. जर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन डिजिटल कॉपी ठेवली तर प्रिंटिंगचा खर्च वाचेल.आजकाल स्मार्ट फोनचा जमाना आहे. या जमान्यात मोठमोठ्या ई-मेलची जागा छोट्या छोट्या एसएमएस किंवा व्हॉटस्अ‍ॅप मेसेजने घेतली आहे. मोठमोठ्या पर्चेस आॅर्डर ई-मेल ऐवजी फक्त छोटासा एसएमएस किंवा व्हॉटस् अ‍ॅपवरून देण्याचा ट्रेण्ड सुरू झाला आहे.कीबोर्ड शॉर्टकट ऐवजी तुम्ही काही अ‍ॅप्ससुद्धा कॉम्प्युटर स्क्रीन शॉट घेण्यासाठी वापरू शकता. जसे की, स्निपिंग टूल्स, जिंग, स्नॅगइट किंवा स्कीच.

स्क्रीनशॉट म्हणजे स्क्रीनचा घेतलेला फोटो. मग तो स्क्रीन तुमच्या कॉम्प्युटरचा असेल किंवा लॅपटॉपचा असेल किंवा हल्लीच्या टॅबलेट अथवा स्मार्ट फोनचाही असू शकतो. स्क्रीनशॉट अथवा स्क्रीनचा फोटो घेण्यासाठी कुठल्याही कॅमेऱ्याची गरज पडत नाही, तर कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्ट फोनमध्येच काही युक्त्या वापरून तुमच्या डिव्हाईसचा स्क्रीनशॉट घेता येतो.स्क्रीनशॉटचे महत्त्वटेक्नोसॅव्ही जगतामध्ये स्क्रीनशॉटला फार महत्त्व आहे ; कारण स्क्रीनशॉटचा वापर करून टेक्नोसॅव्ही मंडळी मोठमोठे प्रॉब्लेम्स सोडवितात. समजा तुम्ही कॉम्प्युटरवर काम करीत आहात आणि तुमच्या सॉफ्टवेअरने अचानक एक मोठा तीन-चार ओळींचा धोक्याचा इशारा (एरर मेसेज) देऊन काम थांबविले तर अशा वेळी तुम्ही काय कराल ? तुम्ही तुमच्या टेक्निकल टीमला तो धोक्याचा इशारा (एरर मेसेज) वाचून दाखविता ; मात्र तुम्ही वाचून दाखविलेले एक तर समोरच्याला कळत नाही किंवा तुम्ही एरर मेसेज वाचताना काही तरी गडबड करता आणि तुमची टेक्निकल सपोर्ट टीम तुम्हाला मदत करू शकत नाही. त्यामुळे अमुल्य वेळ तर वाया जातोच ; मात्र मनस्ताप होतो, तो वेगळाच ! अशा वेळी जर तुमच्या सॉफ्टवेअरच्या एरर मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन जर तुमच्या टेक्निकल सपोर्ट टीमला पाठविला तर त्यांना स्क्रीनशॉट बघून नेमका कुठे प्रॉब्लेम आहे, हे लवकर लक्षात येईल आणि तुम्हाला टेक्निकल सपोर्ट टीमकडून लवकरात लवकर सोल्युशन मिळेल.हल्लीचा जमाना हा आॅनलाईनचा आहे. म्हणजे आॅनलाईन शॉपिंग, आॅनलाईन बँकिंग, आॅनलाईन  आयटी रिटर्न आदी सर्व गोष्टी आॅनलाईन करताना एक ट्रान्झॅक्शन नंबर जनरेट होतो. त्याची तुम्ही प्रिंट घेता व सांभाळून ठेवता. त्याऐवजी जर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन डिजिटल कॉपी ठेवली तर प्रिंटिंगचा खर्च वाचेल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत केल्याचा आनंद मिळेल.तुम्ही जर एखाद्या सॉफ्टवेअर वापरण्यासंबंधी सूचना किंवा प्रशिक्षण कुणाला तरी फोनवर देत आहात, तुम्ही अगदी पोटतिडिकीने समोरच्याला फोनवर समजावून सांगता; मात्र त्याला तुम्ही काय सांगता हे काहीच कळत नाही. अशा वेळी  जर स्टेप बाय स्टेप स्क्रीन शॉट घेऊन तुम्ही समोरच्याला पाठविले तर त्याच्या ते लवकर लक्षात येईल.आजकाल स्मार्ट फोनचा जमाना आहे. या जमान्यात मोठमोठ्या ई-मेलची जागा छोट्या छोट्या एसएमएस किंवा व्हॉटस्अ‍ॅप मेसेजने घेतली आहे. मोठमोठ्या पर्चेस आॅर्डर ई-मेल ऐवजी फक्त छोटासा एसएमएस किंवा व्हॉटस् अ‍ॅपवरून देण्याचा ट्रेण्ड सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे एसएमएसवर आॅर्डर मिळाल्याचा मेसेज मागवू शकता; मात्र अशा वेळी तुम्हाला जर पुरावा म्हणून एसएमएस किंवा व्हॉटस्अ‍ॅप ठेवायचे असतील तर स्मार्टफोनचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता किंवा बँक ट्रॅन्झॅक्शनचे एसएमएसचा स्क्रीन शॉट घेऊन ठेवू शकता ; म्हणजे तुमचा स्मार्टफोन खराब झाला तरी महत्त्वाच्या मेसेज स्क्रीनशॉटच्या रूपाने तुमच्याकडे बॅकअप असतो. एवढे स्मार्टफोन स्क्रीन शॉटचे महत्त्व आहे.कॉम्प्युटरचा स्क्रीनशॉट कसा घ्याल?स्क्रीनशॉट घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यासाठी काही कीबोर्ड शॉर्टकटस् वापरले जातात अथवा स्क्रीनशॉटसाठी काही आॅप्शन्सदेखील उपलब्ध आहेत.  कॉम्प्युटर स्क्रीनशॉट जसे की, पूर्ण स्क्रीनचा स्क्रीन शॉट ,अ‍ॅक्टिव्ह विंडोचा स्क्रीनशॉट किंवा स्क्रीनच्या काही विशिष्ट  भागाचा स्क्रीनशॉट आदी .तुमच्या संपूर्ण कॉम्प्युटर स्क्रीनचा स्क्रीन शॉट घ्यायचा असल्यास की बोर्डवरील प्रिंटस्क्रीन ही की दाबावी. त्यानंतर पेंट ओपन करून त्यामध्ये पेस्ट करावे. म्हणजे पूर्ण स्क्रीन इमेज पेंटमध्ये पेस्ट होईल. त्यानंतर त्याला ईमेज म्हणून सेव्ह करावे.तुम्हाला फक्त स्क्रीनवरील अ‍ॅक्टिव्ह विंडो किंवा डायलॉग बॉक्स कॉपी करायचा असल्यास अल्टर प्लस प्रिंट स्क्रीन दाबून पेंटमध्ये पेस्ट करावे. स्क्रीन शॉट पेस्ट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड, गुगल डॉक्स, पेंट किंवा फोटो शॉप यापैकी काहीही वापरू शकता.स्क्रीनशॉट अ‍ॅप्सकीबोर्ड शॉर्टकट ऐवजी तुम्ही काही अ‍ॅप्ससुद्धा कॉम्प्युटर स्क्रीन शॉट घेण्यासाठी वापरू शकता. जसे की, स्निपिंग टूल्स, जिंग, स्नॅगइट किंवा स्कीच. त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्क्रीन रेकॉर्डिंग करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला जिंग, अ‍ॅक्टिव्ह प्रझेंटर (विंडोज) वापरू शकता.अ‍ॅण्ड्रॉईड डिव्हाईसेसचा स्क्रीन शॉटअ‍ॅण्ड्रॉईड डिव्हाईसेसचा स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्हाला व्हॉल्युम डाऊन आणि पॉवर हे दोन्ही बटण एकाच वेळी दाबावे लागतील. यावेळी फोटो काढल्यासारखा क्लिक असा आवाज होतो आणि तुमच्या स्मार्ट फोन स्क्रीनचा फोटो घेतला जातो. तो स्क्रीनशॉट फोटो गॅलरीमध्ये किंवा फोटो अ‍ॅपमध्ये सेव्ह होतो.जर तुमच्या स्मार्ट फोनमध्ये लेटेस्ट अ‍ॅण्ड्रॉईड ओएस असेल तर त्यामध्ये स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्ही फक्त पॉवर बटण एक-दोन सेकंदांसाठी दाबून ठेवल्यास एक नवीन मेनू स्क्रीनवर येतो आणि त्यामध्ये स्क्रीनशॉट हे आॅप्शन सिलेक्ट केले जाते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल