शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

Vivo Y74s 5G Phone: 50MP कॅमेरा आणि मीडियाटेक प्रोसेसरसह Vivo Y74s 5G आला बाजारात 

By सिद्धेश जाधव | Updated: November 22, 2021 15:52 IST

Vivo Y74s 5G Price Launch: Vivo Y74s 5G Phone चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB RAM, 44W Fast Charging आणि 50MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo ने गेल्या महिनाभरात अनेक फोन्स आपल्या वाय सीरिजमध्ये उतरवले आहेत. यात 4G तसेच काही 5G Phones चा देखील समावेश आहे. आता कंपनीने अजून फोन या सीरिज अंतर्गत चीनमध्ये सादर केले आहे. हा नवीन 5G स्मार्टफोन कंपनीने Vivo Y74s 5G नावाने सादर केला आहे. आपल्या होम मार्केट सादर केलेला हा फोन जागतिक बाजारात कधी उपलब्ध होईल हे मात्र सांगता येत नाही.  

Vivo Y74s 5G ची किंमत 

Vivo Y74s 5G हा स्मार्टफोन एकाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. शेजारच्या देशात हा फोन 2,299 चायनीज युआनमध्ये विकत घेता येईल. अर्थात हा फोन सुमारे 26,800 भारतीय रुपयांमध्ये लाँच झाला आहे.  

Vivo Y74s 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y74s 5G मध्ये कंपनीने वॉटर ड्रॉप नॉच असलेला 6.58-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. या डिवाइसला मीडियाटेक डायमेन्सिटी 810 SoC ची ताकद देण्यात आली आहे. हा प्रोसेसर रेडमी नोट 11 मध्ये देखील आहे. चिपसेटसह फोनमध्ये 4GB व्हर्च्युअल रॅमला आणि 8GB रॅम मिळतो. त्यामुळे या फोनची रॅम क्षमता 12GB होते. यात 256GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.  

हा ड्युअल सिम 5G फोन 4G VoLTE, USB टाइप-C, 3.5mm हेडफोन जॅक इत्यादी कनेक्टिविटी फीचर्सना सपोर्ट करतो. Vivo Y74s 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे, ज्याला 2MP च्या डेप्थ सेन्सरची जोड देण्यात आली आहे. या विवो फोनमध्ये 44Wफास्ट चार्जिंग सपोर्टसह 4100 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान