शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

12GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Vivo Y33s भारतात लाँच; जाणून घ्या शानदार स्मार्टफोनची किंमत  

By सिद्धेश जाधव | Updated: August 23, 2021 15:15 IST

Vivo Y33s Price: आज Vivo Y33s अधिकृतपणे भारतात सादर करण्यात आला आहे. या विवो फोनमध्ये एक्सटेंडेड रॅम फिचर देण्यात आले आहे.

ठळक मुद्देस्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.या फोनमध्ये 8GB रॅमसह 4GB एक्सटेंडेड रॅम मिळतो. 

गेल्याच आठवड्यात विवोने भारतात आपल्या वाय सीरिजचा विस्तार करत Vivo Y21 2021 स्मार्टफोन सादर केला होता. त्याच दिवशी कंपनीने Vivo Y33s स्मार्टफोन देखील अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट केला होता. परंतु नंतर ही लिस्टिंग काढून टाकण्यात आली. आज Vivo Y33s अधिकृतपणे भारतात सादर करण्यात आला आहे. या विवो फोनमध्ये एक्सटेंडेड रॅम फिचर देण्यात आले आहे. गरजेनुसार तुम्ही तुमच्या फोनचा रॅम वाढवू शकता. विवो वाय33एस स्मार्टफोन Helio G80 चिपसेटसह ऑनलाईन तसेच ऑफलाईन खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

Vivo Y33s चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo Y33s मधील डिस्प्ले तिन्ही कडा बेजल लेस आणि रुंद चीन पार्टसह सादर करण्यात आला आहे. हा एक  6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. वॉटर ड्रॉप नॉच असलेला हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 2408x1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या विवो फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB रॅमसह 4GB एक्सटेंडेड रॅम मिळतो, एकूण या फोनमध्ये 12GB रॅम वापरता येतो. या फोनमध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11.1 सह चालतो. हे देखील वाचा:  विवोचा नवीन स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 5000mAh बॅटरी, 5GB रॅमसह Vivo Y21 बाजारात दाखल

Vivo Y33s स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सरला मिळतो. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. साईड माउंटेड फिंगरप्रिंटसह या फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. विवो वाय33एस मधील 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. हे देखील वाचा:  स्वस्तात मस्त Realme C21Y भारतात लाँच; कमी किंमत मिळणार 5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम

Vivo Y33s ची किंमत  

Vivo Y33s चा एकमेव रॅम आणि स्टोरेज भारतात सादर झाला आहे. हा फोन व्हेरिएंट मिडडे ड्रीम आणि मिरर ब्लॅक अश्या दोन रंगात विकत घेता येईल. विवोच्या अधिकृत वेबसाईट आणि Amazon, Flipkart, Paytm, आणि Tatacliq अश्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरून Vivo Y33s 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड