शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

विवोचे शक्तीप्रदर्शन! 12GB रॅम, स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह शानदार Vivo X70 Pro Plus भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: September 30, 2021 15:46 IST

Vivo X70 Pro Plus Price In India: Vivo X70 Pro Plus स्मार्टफोन Snapdragon 888+, 120Hz रिफ्रेश रेट, 55W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेऱ्यासह भारतात आला आहे.

विवोने आपली फ्लॅगशिप Vivo X70 सीरीज आज भारतात सादर केली आहे. या सीरिजमधील तीन स्मार्टफोन्सपैकी Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro+ हे दोन फोन भारतीयांच्या भेटीला आले आहेत. या लेखात आपण शक्तिशाली Vivo X70 Pro Plus ची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्सची माहिती घेणार आहोत.  

Vivo X70 Pro Plus चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo X70 Pro Plus मध्ये 6.78-इंचाचा QHD+ Samsung E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह येणारा हा फोन कॉर्निग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 888 प्लस प्रोसेसर मिळतो. ज्याला Adreno 660 GPU ची जोड देण्यात आली आहे.  

हा फोन 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 11 आधारित OriginOS वर चालतो. यातील 4500mAh ची बॅटरी 55W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन्स मिळतात.      

Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 50MP चा Samsung GN1 सेन्सर आहे. त्याचबरोबर 48MP IMX598 अल्ट्रा वाईड सेन्सर गिम्बल स्टॅबिलायजेशनसह मिळतो. सोबत 12MP डेप्थ सेन्सर आणि 8MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे चारही रियर कॅमेरे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनला सपोर्ट करतात, अश्या कॅमेरा सेटअपसह येणारा हा पहिलाच स्मार्टफोन असावा.   

Vivo X70 Pro Plus ची किंमत 

Vivo X70 Pro Plus ची किंमत 79,990 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत फोनच्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज स्टोरेज व्हेरिएंटची आहे. आता डिवाइस भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे आणि याची विक्री 12 ऑक्टोबरपासून सुरु होईल.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान