शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

एका क्लिकमध्ये झक्कास सेल्फी; Vivo V23e फोन करणार 44MP फ्रंट कॅमेऱ्यासह एंट्री  

By सिद्धेश जाधव | Updated: December 30, 2021 18:52 IST

Vivo V23 Series लवकरच भारतीयांच्या भेटला येत आहे. या सीरिज अंतर्गत 44MP Selfie Camera आणि 44W फास्ट चार्जिंग असलेला Vivo V23e लाँच होणार आहे.  

Vivo V23 Series भारतात लाँच होणार आहे. ही सीरिज 5 जानेवारीला Vivo V23 आणि Vivo V23 Pro या फोन्ससह सादर केली जाईल. हे दोन्ही फोन्स ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यासह येतील. आता आलेल्या बातमीनुसार या सिरीजमध्ये Vivo V23e देखील सादर केला जाणार आहे. हा 5G Phone याआधी थायलंडमध्ये सादर करण्यात आला आहे.  

91 Mobiles च्या रिपोर्टनुसार, Vivo V23e, Vivo V23 आणि Vivo V23 Pro हे तिन्ही फोन्स फेब्रुवारीमध्ये भारतीयांच्या भेटीला येतील. या हँडसेटची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान ठेवली जाईल.  

Vivo V23e 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo V23e 5G मध्ये 6.44 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हा डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. या ड्युअल सिम फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पॉवर बॅकअपसाठी 4,050एमएएचची बॅटरीला 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.   

Vivo V23e 5G मध्ये पॉवर पॅक कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याची सुरुवात 44 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यापासून होते. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. 

हे देखील वाचा:  

सेकंड हँड स्मार्टफोन घेताना ‘या’ चुकांमुळे तुमचे पैसे जाऊ शकतात वाया

फक्त 7,499 रुपयांमध्ये आला 5000mAh Battery असलेला शानदार स्मार्टफोन; Redmi ला टाकणार मागे?

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान