शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त सेल्फी कॅमेऱ्यासह आला Vivo V23e 5G Phone; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: November 24, 2021 12:00 IST

Vivo V23e 5G Phone Price In India: Vivo V23e 5G थायलंडमध्ये 44MP Selfie Camera, MediaTek Dimensity 810 चिपसेट, 8GB RAM आणि 50MP Rear Camera अशा स्पेसिफिकेशन्ससह सादर झाला आहे.  

Vivo V23e 5G Phone Price: Vivo ने गेले काही दिवसांमध्ये आपल्या वाय सीरिजमध्ये अनेक फोन्स सादर केले आहेत. परंतु आता कंपनीने आपल्या व्ही सीरिजचा विस्तार करत नवीन 5G Phone थायलंडमध्ये सादर केला आहे. नवीन विवो फोन Vivo V23e 5G नावाने टेक मार्केटमध्ये लाँच झाला आहे. फोनमधील 44MP Selfie Camera ही याची खासियत आहे. परंतु त्याचबरोबर यात MediaTek Dimensity 810 चिपसेट, 8GB RAM आणि 50MP Rear Camera देखील मिळतो.  

Vivo V23e 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo V23e 5G मध्ये 6.44 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हा डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. या ड्युअल सिम फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पॉवर बॅकअपसाठी 4,050एमएएचची बॅटरीला 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.  

Vivo V23e 5G मध्ये पॉवर पॅक कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याची सुरुवात 44 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यापासून होते. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. 

Vivo V23e 5G Phone ची किंमत 

Vivo V23e 5G चा एकमेव 8GB RAM आणि 128 जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट थायलंडमध्ये 12,999 THB मध्ये उपलब्ध झाला आहे. ही किंमत भारतीय चलनात 28,999 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. हा फोन भारतासह जागतिक बाजारात कधी उपलब्ध होईल हे मात्र अजून समोर आलं नाही.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान