शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

रंग बदलणारा भन्नाट स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात; Vivo V23 Pro 5G वर हजारोंची सूट, चकचक सेल्फीसाठी दोन कॅमेरे

By सिद्धेश जाधव | Published: January 13, 2022 3:54 PM

Vivo V23 Pro Price In India: Vivo V23 Pro स्मार्टफोन भारतात 12GB RAM, 108MP Camera आणि 50MP ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे.

Vivo V23 Pro 5G ची विक्री आजपासून सुरु झाली आहे. यातील फ्लोराइट एजी ग्लास बॅक पॅनल यूव्ही लाईटमध्ये आल्यानंतर रंग बदलतो. या सीरिजमधेही Vivo V23 5G स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. Vivo V23 Pro 5G आजपासून विकत घेता येईल. या स्मार्टफोन कंपनीनं ऑफर्सची घोषणा देखील केली आहे.  

Vivo V23 Pro Price In India

विवो वी23 प्रो च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 38,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर फोनचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 43,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन स्टारडस्ट ब्लॅक आणि सनशाइन गोल्ड कलरमध्ये फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्समधून देखील विकत घेता येईल.  

फ्लिपकार्टवरून हा फोन विकत घेताना HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास 3000 रुपयांची बचत होऊ शकते. तर ICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांना देखील 10 टक्के सवलत मिळत आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन आणखीन 16,950 रुपये वाचवू शकता.  

Vivo V23 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

विवो वी23 प्रो च्या फ्रंटला ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सलची सुपर वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सोबत कंपनीनं फ्रंट फ्लॅश देखील दिला आहे. बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा अल्ट्रा क्लियर प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सोबत 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे.   

Vivo V23 Pro मध्ये 6.56 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला मीडियाटेक डिमेनसिटी 1200 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. सोबत ग्राफिक्ससाठी माली जी77 एमसी9 जीपीयू मिळतो. हा डिवाइस अँड्रॉइड 12 ओएस बेस्ड फनटच ओएस 12 वर चालतो.   

यात 12GB पर्यंत RAM देण्यात आला आहे, सोबत 4GB व्हर्च्युअल रॅम मिळतो त्यामुळे एकूण 16GB रॅम होतो. हा फोन 256GB स्टोरेजसह विकत घेता येईल. Vivo V23 Pro एक ड्युअल सिम फोन 5G Phone आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी 4,300एमएएचची बॅटरी 44वॉट फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.   

हे देखील वाचा:

LPG Subsidy चे पैसे अकॉउंटमध्ये येत आहेत कि नाही असे करा चेक; सहज करता येणार तक्रार

PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान