शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन 13 ऑक्टोबरला येणार भारतात; 64MP कॅमेऱ्यासह येणार बाजारात  

By सिद्धेश जाधव | Updated: October 11, 2021 19:08 IST

Vivo phone Vivo V21 5G price in India: Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन भारतात 13 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे  

विवो आपल्या Vivo V21 5G स्मार्टफोनचा नवीन कलर व्हेरिएंट भारतात सादर करणार आहे. हा फोन Vivo V21 5G Neon Spark नावाने लाँच केला जाईल, अशी माहिती कंपनीने सोशल मीडिया पोस्टमधून दिली आहे. हा स्मार्टफोन भारतात 13 ऑक्टोबरला लाँच केला जाईल. विशेष म्हणजे Vivo V21 5G स्मार्टफोन भारतात एप्रिलमध्ये लाँच केला गेला होता.  

Vivo India ने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या फोनचा एक टीजर व्हिडीओ शेयर केला आहे. आणि Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन 13 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल, असे सांगितले आहे. नवीन नियॉन कलर ऑप्शन ब्राईट येलो कलर व्यतिरिक्त फोनमध्ये इतर कोणताही बदल करण्यात आला नाही.  

Vivo V21 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo V21 5G मध्ये 6.44 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि रिजोल्यूशन 1080p आहे आहे. कंपनीने यात MediaTek Dimensity 800U प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन 11GB पर्यंतच्या रॅमसह सादर करण्यात आला आहे, ज्यात 8GB RAM आणि 3GB एक्सटेंड RAM मिळतो. फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन Android 11 आधारित Funtouch OS 11.1 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी 33W फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.  

Vivo V21 5G स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह 64MP OIS सेन्सर, 8MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2 MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 44 MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. जो OIS आणि डुअल LED फ्रंट फ्लॅशला सपोर्ट करतो. ही या फोनची खासियत म्हणता येईल.  

Vivo V21 5G ची किंमत 

Vivo V21 5G स्मार्टफोन 8+3GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर या फोनचा 256GB वेरिएंट 32,990 रुपयांमध्ये विकत घेता येतो. नवीन कलर व्हेरिएंट देखील याच किंमतीत उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान