शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

रेडमी-रियलमीला मिळणार विवोकडून आव्हान; 4 मेला भारतात लाँच होणार दोन नवे मोबाईल  

By सिद्धेश जाधव | Updated: April 28, 2022 09:33 IST

Vivo T1 Pro 5G आणि Vivo T1 44W हे दोन डिवाइस भारतात येत्या 4 मेला लाँच केले जातील, अशी माहिती विवो इंडियानं दिली आहे.

Vivo नं यंदा आपली नवीन ‘टी’ सीरिज बाजारात आणली आहे. जागतिक बाजारात कंपनीनं या सीरिजचा विस्तार सुरु ठेवला आहे. आता भारतात देखील Vivo T1 5G नंतर कंपनी दोन नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. Vivo T1 Pro 5G आणि Vivo T1 44W हे दोन डिवाइस भारतात येत्या 4 मेला लाँच केले जातील, अशी माहिती विवो इंडियानं दिली आहे.  

येत्या 4 मेला भारतात Vivo T1 Pro 5G आणि Vivo T1 44W हे दोन डिवाइस सादर केले जातील, अशी माहिती विवोनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. हा लाँच इव्हेंट दुपारी 12 वाजता सुरु करण्यात येईल आणि याचं थेट प्रक्षेपण कंपनीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून करण्यात येईल. फ्लिपकार्टवर विवो टी1 प्रो 5जी फोन आणि विवो टी1 44वॉटचे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहेत, त्यामुळे हे फोन फ्लिपकार्टवरून विकले जातील हे स्पष्ट झालं आहे.  

संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

नावाप्रमाणे Vivo T1 44W स्मार्टफोन भारतात आलेल्या Vivo T1 चा 44W फास्ट चार्जिंग असलेला व्हेरिएंट असू शकतो. तर जागतिक मलेशियात आलेला विवो टी1 5जी स्मार्टफोन भारतात Vivo T1 Pro 5G नावानं लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजदेण्यात आली आहे. तिथे हा डिवाइस 22,000 रुपयांच्या आसपास उपलब्ध झाला आहे.  

Vivo T1 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo T1 5G मध्ये 6.58-इंचाची फुल एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात येईल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो.  

फोटोग्राफीसाठी Vivo T1 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Vivo T1 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Vivoविवो