Vivo नं आपल्या आगामी स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. त्यानुसार, 22 डिसेंबरला Vivo S12 सीरीज चीनमध्ये सादर केली जाईल. या सीरिजमध्ये Vivo S12 आणि S12 Pro असे दोन फोन येतील. ही सीरिज यावर्षी जुळ्यामध्ये आलेल्या Vivo S10 सीरिजची जागा घेईल. कंपनीनं शेयर केलेल्या व्हिडीओमधून हँडसेटच्या डिजाइनची झलक मिळाली आहे.
Vivo S12 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Vivo S12 आणि Vivo S12 Pro हे दोन स्मार्टफोन पुढील आठवड्यात लाँच केले जातील. लीकनुसार या दोन्ही स्मार्टफोनमध्ये आयताकृती नॉच असलेला डिस्प्ले देण्यात येईल. अशी नॉच सध्या अँड्रॉइड डिव्हाइसेसमध्ये मिळत नाही. या मोठ्या नॉचचा वापर 50MP चा मुख्य Samsung JN1 सेल्फी सेन्सर आणि 8MP च्या अल्ट्रा वाईड सेन्सर देण्यासाठी केला जाऊ शकतो.
यात हँडसेटमध्ये बॅक पॅनलवर 108MP चा प्रायमरी सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. प्रो मॉडेलमध्ये कर्व्ड एज असलेला डिस्प्ले मिळू शकतो. तसेच Vivo S12 सीरीजमध्येMediaTek चा Dimensity 1200 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये OriginOS Ocean UI आणि 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळू शकतो.