शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

या दोन स्मार्टफोन्समध्ये डाटा पॅकशिवाय इंटरनेट वापराची मिळणार सुविधा!

By शेखर पाटील | Updated: April 3, 2018 14:56 IST

हाईक या भारतीय मॅसेंजरने विकसित केलेले टोटल अ‍ॅप इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे.

डाटा पॅकशिवाय इंटरनेटचा वापर करण्याची आपण कल्पना करू शकणार नाही. तथापि, इंटेक्स कंपनीने याच प्रकारची सुविधा असणारे दोन स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत.

इंटेक्स कंपनीने आपले अ‍ॅक्वा लॉयन्स एन १ आणि अ‍ॅक्वा लॉयन्स टी १ लाईट हे दोन स्मार्टफोन नव्याने बाजारपेठेत सादर केले आहेत. यात हाईक या भारतीय मॅसेंजरने विकसित केलेले टोटल अ‍ॅप इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. टोटल अ‍ॅप इंटरनेट नसतांनाही कार्य करते. याच्या माध्यमातून मॅसेजिंग, बातम्या, हवामानासह विविध अलर्टस्, क्रिकेटचा स्कोअर, दैनंदिन ज्योतिष्य आदींसह विविध रिचार्जदेखील करता येतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यावरून विविध आर्थिक व्यवहारदेखील शक्य आहेत. या अ‍ॅपसाठी अँड्रॉइड प्रणालीची विशेष आवृत्ती वापरण्यात आली आहे. याचा वापर करण्यासाठी मोबाईल क्रमांकाच्या मदतीने सिंगल लॉगीनची सुविधा दिलेली असेल. विशेष म्हणजे हे अ‍ॅप अवघे १ मेगाबाईट आकारमानाचे आहे. टोटल हे अ‍ॅप अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंटरी सर्व्हीस डाटा म्हणजेच युएसएसडी या तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात इंटरनेटविना फक्त जीएसएम नेटवर्कवर संदेशांची देवाण-घेवाण करता येते.  

इंटेक्स अ‍ॅक्वा लायन्स एन१ या मॉडेलमध्ये चार इंची डब्ल्यूव्हिजीए (८०० बाय ४८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील मुख्य कॅमेरा २ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा ०.३ मेगापिक्सल्सचा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. 

तर इंटेक्स अ‍ॅक्वा लॉयन्स टी १ लाईट या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए (८५४ बाय ४८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले आहे. याची रॅम १ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यात २२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. यामध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशसह ५ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे अनुक्रमे मुख्य व फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. एयरटेलच्या कॅशबॅक ऑफरच्या अंतर्गत इंटेक्स लॉयन्स एन१ हा स्मार्टफोन २८२३ तर लॉयन्स टी १ लाईट हे मॉडेल ३,८९९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान