शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आयफोनमध्ये वापरा अँड्रॉइड अ‍ॅप्स ! 

By शेखर पाटील | Updated: August 8, 2017 12:48 IST

आयफोनमध्ये अँड्रॉइड अ‍ॅप्सचा वापर करता येईल यावर आपला विश्‍वास बसणार नाही. मात्र याच पध्दतीची सुविधा देणारे एक उपकरण आता भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे.

आयफोनमध्ये अँड्रॉइड अ‍ॅप्सचा वापर करता येईल यावर आपला विश्‍वास बसणार नाही. मात्र याच पध्दतीची सुविधा देणारे एक उपकरण आता भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. आयफोनमध्ये आयओएस प्रणाली वापरण्यात येत असून अन्य बहुतांश स्मार्टफोन अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे आहेत. जगात अन्य सिस्टीम्सदेखील प्रचलीत असल्या तरी स्मार्टफोनच्या वापरातील सर्वात मोठा वाटा अँड्रॉइड आणि आयओएस यांच्या विभागीत झालाय ही बाब उघड आहे. प्रत्येक ऑपरेटींग सिस्टीमची स्वत:ची खासियत आहे. याचा विचार करता या दोन्ही प्रणालींची बलस्थाने आणि कमकुवत दुवेदेखील आहेत. या पार्श्‍वभूमिवर, एकाच स्मार्टफोनमध्ये दोन्ही सिस्टीम वापरता आल्या तर...? असा विचार आपल्या मनात येऊ शकतो. असा कोणताही स्मार्टफोन सध्या तरी बाजारपेठेत उपलब्ध नसला तरी एका युक्तीचा वापर करून कुणीही युजरला दोन्ही प्रणालींचा वापर करणे शक्य आहे. या अनुषंगाने येर्‍हा.कॉम ( http://www.yerha.com/page/en/mesuit) या संकेतस्थळाने भारतीय बाजारपेठेत मेसुट या नावाने आयफोनची केस (आवरण) सादर केली असून यात नेमकी हीच सुविधा देण्यात आली आहे.

मेसुट या केसमध्ये आयफोनसाठी अतिरिक्त १,७५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी, १६ जीबी स्टोअरेज आणि सेकंड सीमकार्ड टाकण्याची सुविधा देण्यात आली आहे. अर्थात या सर्व बाबी आयफोनच्या कार्यक्षमतेचा वाढ करणार्‍या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच्या मदतीने आयफोनवर अँड्रॉइड प्रणालीचा वापर करता येणार आहे. एकदा ही केस आयफोनला (सध्या आयफोन ६ आणि आयफोन ६एस हे मॉडेल्स याच्याशी संलग्न करता येतील.) कनेक्ट केली की, आयफोनच्या डिस्प्लेवरील एका विशिष्ट आयकॉनवर क्लिक करताच आयओएसवरून अँड्रॉइड प्रणालीवर स्मार्टफोन शिफ्ट होईल. या केसमध्ये अँड्रॉइड प्रणालीवर आधारित मेसुट आयओएस १.० ही प्रणाली देण्यात आली आहे. याचा वापर करून गुगल प्ले स्टोअरवरून हवे ते अँड्रॉइड अ‍ॅप इन्टॉल करून वापरणे शक्य आहे. अर्थात याच्या जोडीला अजून एक सीमकार्ड मिळत असल्यामुळे एकाच आयफोनमध्ये दोन सीमकार्ड वापरण्यासह अतिरिक्त बॅटरी आणि वाढीव १६ जीबी स्टोअरेजच्या सुविधा (ज्या आयफोनमध्ये नाहीत !) मिळतात. हे मॉडेल येर्‍हा.कॉम या शॉपिंग पोर्टलवरून ९,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

 

पहा : मेसुट केसची कार्यप्रणाली दर्शविणारा हा व्हिडीओ.

https://player.vimeo.com/video/226545652" width="800" height="500" frameborder="0" webkitallowfullscreen mozallowfullscreen allowfullscreen>