शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

लेनोव्होचे थिंकपॅड मालिकेत दोन बिझनेस लॅपटॉप

By शेखर पाटील | Updated: September 11, 2017 09:37 IST

लेनोव्हो कंपनीने आपल्या थिंकपॅड या मालिकेत ए२७५ आणि ए४७५ हे दोन लॅपटॉप सादर केले असून यात विविध प्रॉडक्टीव्हिटी टुल्स प्रदान करण्यात आले आहेत. 

लेनोव्हो ए२७५ आणि ए४७५ हे दोन्ही लॅपटॉप विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे आहेत. यातील बरेचसे फिचर्स हे समान आहेत. दोन्ही लॅपटॉप उत्तम दर्जाच्या बॅटरीने सज्ज असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० तास चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. दोन्ही मॉडेलमध्ये एएमडी प्रो ए १२ हा प्रोसेसर देण्यात आला असून याला रेडिऑन आर७-क्लास या ग्राफीक कार्डची जोड देण्यात आली आहे.  दोन्ही लॅपटॉप १६ जीबी रॅमने सज्ज असून स्टोअरेजसाठी ५१२ जीबी आणि एक टेराबाईटचे पर्याय देण्यात आले आहेत. 

लेनोव्हो ए२७५ लॅपटॉप मध्ये १२.५ इंची तर लेनोव्हो ए४७५ मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतांचे डिस्प्ले असतील. यात टचस्क्रीन डिस्प्लेचा पर्यायदेखील देण्यात येणार आहे. हे दोन्ही लॅपटॉप एलटीई नेटवर्कला सपोर्ट करणारे आहेत. अर्थात यात फोर-जी नेटवर्कला वापरता येईल. तसेच यात ब्ल्यु-टुथ व वाय-फायचा सपोर्टदेखील असेल. यामध्ये दोन युएसबी ३.०, युएसबी टाईप-ए पोर्ट, एचडीएमआय, युएसबी टाईप-सी कनेक्टर, हेडफोन पोर्ट आदी कनेक्टीव्हटी देण्यात आली आहे.

लेनोव्हो थिंकपॅड ए २७५ हे मॉडेल ८६९ डॉलर्सला तर लेनोव्हो थिंकपॅड ए ४७५ हा लॅपटॉप ८४९ डॉलर्स मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. हे दोन्ही लॅपटॉप ग्राहकांना प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात खरेदी करता येणार आहेत. तर भारतात याची अधिकृत लाँचीग लवकरच होऊ शकते

टॅग्स :technologyतंत्रज्ञान