पुण्याचे तापमान ३६ अंशावर
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
पुणेकरांना जाणवू लागला उकाडा
पुण्याचे तापमान ३६ अंशावर
पुणेकरांना जाणवू लागला उकाडापुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात असलेले ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचे सावट सरल्याने शहराच्या तापमानात २ दिवसांपासून सातत्याने वाढ नोंदविली गेली आहे. आज शहराचे कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे पुणेकरांना उकाडा जाणवू लागला आहे.ऐन मार्च महिन्यात शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अर्धा मार्च महिना शहराचे कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या खालीच होते. त्यामुळे मार्च महिन्यात उकाडयाऐवजी थंडी जाणवत होती. मात्र आता हे संकट हटल्याने शहराच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. अशीच स्थिती उपनगरांमध्येही आहे. आज लोहगावचे कमाल तापमान ३६.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. उन्हाचे चटके बसू लागल्याने पुणेकरांनी सनकोट, गॉगल्स घालून काळजी घेण्यास सुरूवात केली आहे. कमालबरोबर किमान तापमानातही वाढ होऊ लागल्याने रात्रीही उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे रात्री पंख्याचा वापर वाढला आहे.पुढील ४८ तासात तापमानात आणखी वाढ होऊन ते ३८ अंशाच्या घरात जाण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.