शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

5000mAh बॅटरी असेलल्या स्वस्त Tecno Spark Go 2021 चा पहिला सेल आज; जाणून घ्या ऑफर्स 

By सिद्धेश जाधव | Updated: July 7, 2021 11:25 IST

Tecno Spark Go 2021 Sale price: Tecno Spark Go 2021 च्या पहिल्या सेलमध्ये 500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे.

Tecno ने 1 जुलै रोजी भारतात ‘स्पार्क’ सीरीजमध्ये नवीन टेक्नो फोन Tecno Spark Go 2021 लाँच केला होता. या लो बजेट स्मार्टफोनची किंमत 7,299 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु पहिल्या सेलमध्ये हा या स्मार्टफोनवर 500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे हा टेक्नो स्मार्टफोन 6,699 रुपयांमध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून अ‍ॅमेझॉन इंडिया या ईकॉमर्स साईटवरून विकत घेता येईल. (Tecno Spark Go 2021 With Android 10 (Go Edition), MediaTek Helio A20 SoC Available in India for Sale) 

Tecno Spark Go 2021 चे स्पेसिफिकेशन्स  

टेक्नो स्पार्क गो 2021 मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 10 (Go Edition) आधारित हाईओएस 6.2 सह सादर करण्यात आला आहे. हा टेक्नो स्मार्टफोन मीडियाटेकच्या Helio A20 चिपसेटवर चालतो. या फोन 2 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रो एसडीकार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.  

फोटोग्राफीसाठी TECNO Spark Go 2021 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक एआय लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये फ्रंट फ्लॅश लाईटसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. टेक्नोचा हा ड्युअल सिम फोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.  हा स्मार्टफोन 7 जुलैपासून अ‍ॅमेझॉनवर विकत घेता येईल. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनamazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड