शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोन-दोन सेल्फी कॅमेऱ्यासह येतोय ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन; किंमत असेल परवडणारी  

By सिद्धेश जाधव | Updated: April 6, 2022 12:25 IST

Tecno Phantom X स्मार्टफोन जागतिक बाजारात 48MP ड्युअल सेल्फी कॅमेरा, 8GB RAM आणि 33W फास्ट चार्जिंगसह सादर झाला आहे.  

Tecno ने गेल्यावर्षी जूनमध्ये Phantom X नावाचा स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केला होता. आता हा फोन भारतीय ग्राहकांच्या भेटीला येणार असल्याची बातमी आली आहे. PassionateGeekz च्या रिपोर्टनुसार, Tecno Phantom X स्मार्टफोन एप्रिलमध्ये देशात सादर केला जाऊ शकतो. रिपोर्टमधून फोनच्या कलर आणि स्टोरेज व्हेरिएंटची माहिती दिली आहे.  

Tecno Phantom X स्मार्टफोन भारतात 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. जागतिक बाजारात मात्र कंपनीनं 256GB स्टोरेज दिली होती. तसेच भारतात हा फोन स्टारी नाईट ब्लू आणि समर सनसेट कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा फोन भारतात 25,000 रुपयांच्या आसपास सादर केला जाऊ शकतो. 

Tecno Phantom X चे स्पेसिफिकेशन्स  

Tecno Phantom X मध्ये कंपनीने 6.7 इंचाचा फुल एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात गोरिल्ला ग्लास 5 चं प्रोटेक्शन दिलं आहे. हा एक कर्व डिस्प्ले आहे जो इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडरसह आला आहे.  

अँड्रॉइड 11 आधारित HiOS वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये Helio G95 चिपसेट देण्यात आला आहे. Phantom X मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जला सपोर्ट करते.  

Tecno Phantom X ची खासियत म्हणजे यातील ड्युअल सेल्फी कॅमेरा. या ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, सोबत 8 मेगापिक्सलची एक अल्ट्रा वाईड लेन्स देण्यात आली आहे. त्याचबरोबर फ्रंट पॅनलवर वरच्या बेजलमध्ये एक LED फ्लॅश देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सलची पोर्टेड लेन्स आणि क्वाड LED फ्लॅश देण्यात आला आहे.   

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन