शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राचा स्पष्ट फोटो काढू शकतो हा शानदार फोन; 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Tecno Camon 18 Premier सादर 

By सिद्धेश जाधव | Updated: October 4, 2021 12:01 IST

Budget Phone with 64MP Camera: Tecno Camon 18 Premier स्मार्टफोन कंपनीने नायजेरियात सादर केला आहे. हा फोन खास कॅमेरा सेगमेंटसह सादर करण्यात आला आहे.

Tecno ने नायजेरियामध्ये Tecno Camon 18 Premier हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा कंपनीने भन्नाट कॅमेरा फीचर्ससह सादर केला आहे. कंपनीने  64-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच हा फोन 60x हायपर झूमच्या मदतीने चंद्राचा स्पष्ट फोटो काढू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. या फोनची किंमत मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे आणि कंपनीचा इतिहास पाहता काही आठवड्यांनी हा फोन भारतात देखील येऊ शकतो.  

Tecno Camon 18 Premier स्पेसिफिकेशन्स 

Tecno Camon 18 Premier स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि  550 ब्राईटनेसला सपोर्ट करतो. प्रोसेससिंगसाठी कंपनीने या डिवाइसमध्ये मीडियाटेक Helio G96 चा वापर केला आहे. टेक्नोचा हा फोन Android 11 वर आधारित Hi OS 8.0 वर चालतो. 

Tecno Camon 18 Premier स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 256GB बिल्ट स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनमधील 4,750mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी यात 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth, GPS, NFC, USB-C, आणि 3.5mm जॅक असे ऑप्शन देण्यात आले आहेत.  

Tecno Camon 18 Premier स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट खूप खास आहे. हा फोन 32-मेगापिक्सलच्या ड्युअल LED फ्लॅश असलेल्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सल गिम्बल स्टेबलाइज्ड कॅमेरा लेन्स आणि 8 मेगापिक्सल पेरिस्कोप झूम लेन्स देण्यात आली आहे. यातील पेरिस्कोप लेन्स 60X हायपर झूमला सपोर्ट करते जी गॅलिलियो अल्गोरिदम इंजिनचा वापर करून चंद्राचा स्पष्ट फोटो क्लिक करू शकते. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान