शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बजेट सेगमेंटमध्ये टीसीएलची दमदार कामगिरी; 48MP कॅमेऱ्यासह TCL 20Y स्मार्टफोन लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: September 7, 2021 16:24 IST

TCL 20Y स्मार्टफोन कंपनीने नुकताच दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या बाजारपेठेत सादर केला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.  

Tcl 20y launch with 48mp main camera 4000mah battery स्मार्टफोन निर्माता कंपनी टीसीएलने आपला नवीन बजेट स्मार्टफोन TCL 20Y सादर केला आहे. हा स्मार्टफोन सध्या कंपंनीने दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या बाजारपेठेत लाँच केला आहे. ब्लॅक आणि ब्लु कलर्समध्ये उपलब्ध होणारा हा स्मार्टफोन Unicsoc SC9863A प्रोसेसरवर चालतो. तसेच यातील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 4,000 एमएएचची बॅटरी देखील देण्यात आली आहे.

TCL 20Y चे स्पेसिफिकेशन्स 

TCL 20Y स्मार्टफोनमध्ये यात 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक आयपीएस एलसीडी पॅनल आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Unicsoc SC9863A प्रोसेसर मिळतो. ज्याला 4GB RAM आणि 64GB स्टोरेजची जोड मिळते. ही स्टोरेज एक्सपांडेबल आहे आणि फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. हा बजेट स्मार्टफोन Android 11 वर चालतो.  

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 4G VoLTE सह Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.0, यूएसबी-टाइप सी पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. तसेच सिक्योरिटीसाठी रियर-माउंटिड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. TCL 20Y स्मार्टफोनमध्ये 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

TCL 20Y ची किंमत  

TCL 20Y स्मार्टफोन फक्त एकच व्हेरिएंटमध्ये सादर झाला आहे. ज्यात 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. जागतिक बाजारात कंपनीने हा फोन 799 घानियन सेडी मध्ये लाँच केला आहे. ही किंमत सुमारे 9,664 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. वर सांगितल्याप्रमाणे हा फोन ब्लॅक आणि ब्लू अश्या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड