शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच आयओएससाठी व्हॉट्सअ‍ॅपचे बिझनेस अ‍ॅप

By शेखर पाटील | Updated: May 8, 2018 11:17 IST

व्हॉट्सअ‍ॅप मॅसेंजरचे बिझनेस अ‍ॅप हे अँड्रॉइडच्या पाठोपाठ आता आयओएस या प्रणालीसाठी सादर करण्यात येणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅपने खास करून व्यावसायिकांसाठी विकसित केलेल्या व्हाटसअ‍ॅप फॉर बिझनेस या अ‍ॅपला गत वर्षाच्या शेवटी लाँच करण्यात आले होते. यानंतर या वर्षाच्या जानेवारी महिन्यात याला भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. अर्थात आजवर फक्त अँड्रॉइडच्या युजर्सलाच याचा वापर करता येत आहे. तथापि, लवकरच हे अ‍ॅप आयओएस या प्रणालीसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याबाबत लवकरच घोषणा होऊने हे अ‍ॅप अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर दाखल होऊ शकते. विद्यमान व्हॉट्सअ‍ॅप युजर याला आपल्या आधीचे मूळ व्हाटसअ‍ॅप अकाऊंट असणार्‍या स्मार्टफोनवर वापरू शकतो. मात्र, याच्या नोंदणीसाठी स्मार्टफोनमधील दुसरा मोबाईल क्रमांक लागणार आहे. यामुळे कुणीही आपल्या ड्युअल सीमकार्डच्या स्मार्टफोनमध्ये मूळ व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅपचे बिझनेस अ‍ॅप हे दोन्ही अ‍ॅप्लीकेशन्स वापरू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपचे बिझनेस अ‍ॅप हे देशातील लहान व मध्यम व्यावसायिकांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. यात कुणीही व्यावसायिक आपल्या ग्राहकांशी थेट संपर्क साधू शकणार आहेत. विशेष बाब म्हणजे ग्राहकाला यात अनावश्यक संदेशांमुळे त्रास होणार नसल्याची काळजीदेखील घेतली जाणार आहे. यात ग्राहक व्यावसायिकांकडून येणार संदेश ब्लॉकदेखील करू शकतो. या अ‍ॅप्लीकेशनमध्ये मूळ व्हॉट्सअ‍ॅप मॅसेंजरमधील सर्व सुविधांसह अन्य विशेष फिचर्स देण्यात आलेले आहेत. यातील प्रमुख फिचर्स खालीप्रमाणे आहेत.

व्हेरिफाईड अकाऊंटव्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅप हे अनेक फिचर्सनी युक्त असून यात व्हेरिफाईड अकाऊंटची व्यवस्थादेखील असेल. याच्या माध्यमातून संबंधीत व्यावसायिकाचा नाव/पत्ता आणि त्याचा मोबाईल क्रमांक हा एकच असल्याची खात्री पटवून तसे व्हेरिफाईट टिकच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे.

बिझनेस प्रोफाईलव्हॉट्सअ‍ॅपच्या बिझनेस अ‍ॅपमध्ये कोणत्याही व्यावसायिकाला आपले प्रोफाईल अपडेट करण्याची सुविधा असेल. यासाठी स्वतंत्र भाग असून यात संबंधीताचे नाव, पत्ता, संकेतस्थळ, ई-मेल आदींचा समावेश असणार आहे. फेसबुकसारख्या सोशल साईटप्रमाणे याची रचना असते.

स्मार्ट मॅसेजींगमॅसेजींग हा व्हॉट्सअ‍ॅपचा आत्मा आहे. यालाच बिझनेस अ‍ॅपमध्ये नवीन पध्दतीने समाविष्ट करण्यात आले आहे. यात बिझनेस चॅटींगला उपयुक्त असणार्‍या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये क्विक रिप्लायचा समावेश असेल. याचा उपयोग करून व्यावसायिकाला ग्राहकांशी थेट आणि तात्काळ संपर्क करता येईल. तसेच व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या माहितीसह विविध ऑफर्सला ग्राहकांपर्यंत सुलभपणे पोहचवू शकतो. यामध्ये मॅसेजींच्या आकडेवारीचे अचूक विश्‍लेषण करणारी प्रणालीदेखील देण्यात आलेली असेल. याच्या मदतीने मॅसेजेसच्या परिणामकारकतेची माहिती मिळू शकते.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपtechnologyतंत्रज्ञान