शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाईड अँगल फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज सोनी एक्सपेरिया एल २

By शेखर पाटील | Updated: February 22, 2018 15:34 IST

सोनी कंपनीने आपला एक्सपेरिया एल २ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारला असून यात वाईड अँगल फ्रंट कॅमेर्‍यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

सोनी कंपनीने आपला एक्सपेरिया एल २ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारला असून यात वाईड अँगल फ्रंट कॅमेर्‍यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

सोनी कंपनीने गेल्या वर्षी एक्सपेरिया एल १ हे मॉडेल लाँच केले होते. सोनी एक्सपेरिया एल २ हा स्मार्टफोन याचीच पुढील आवृत्ती आहे. जानेवारी महिन्याच्या प्रारंभी झालेल्या सीईएस-२०१८मध्ये याला पहिल्यांदा प्रदर्शीत करण्यात आले होते. आता हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात बहुतांश स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरा केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. यावरच काही कंपन्या भर देतांना दिसून येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, सोनी कंपनीने आपल्या सोनी एक्सपेरिया एल २ या मॉडेलमध्येही हाच मार्ग चोखाळला आहे. यातील फ्रंट कॅमेरा हा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा आणि एफ/२.४ अपार्चरयुक्त आहे. यासोबत यात १२० अंशाचा वाईल अँगल लेन्स प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने विस्तृत भागातील दर्जेदार सेल्फी घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर एफ/२.० अपार्चर आणि एलईडी फ्लॅशने युक्त असणारा यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. 

सोनी एक्सपेरिया एल २ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात सोनी कंपनीने विकसित केलेल्या इमेज इनहान्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा एमटी ६७३७टी हा प्रोसेसर असेल. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. क्युनोव्हो अ‍ॅडाप्टीव्ह चार्जींग या तंत्रज्ञानाने सज्ज असणारी यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात स्टॅमिना मोड आणि बॅटरी सेव्ह हे फिचर्स असल्याने ही बॅटरी दीर्घ काळापर्यंत टिकत असल्याचा कंपनीचा दावा आहे. 

सोनी एक्सपेरिया एल २ या स्मार्टफोनमध्ये मुव्ही क्रियेटर, एआर इफेक्ट आणि एक्सपेरिया लाऊंज आदी अ‍ॅप्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. हे मॉडेल काळा आणि सोनेरी या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना १९,९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.