शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

सोनी स्मार्ट स्पीकर देणार गुगल, अ‍ॅपल अमेझॉनला आव्हान !

By शेखर पाटील | Updated: September 1, 2017 22:02 IST

सोनी कंपनीनेही स्मार्ट स्पीकरच्या माध्यमातून डिजीटल असिस्टंट लाँच केला असून या माध्यमातून या क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या गुगल, अ‍ॅपल आणि अमेझॉनला टक्कर देण्याचे संकेत दिले आहेत.

सोनी कंपनीनेही स्मार्ट स्पीकरच्या माध्यमातून डिजीटल असिस्टंट लाँच केला असून या माध्यमातून या क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या गुगल, अ‍ॅपल आणि अमेझॉनला टक्कर देण्याचे संकेत दिले आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून सोनी कंपनीदेखील स्मार्ट डिजीटल असिस्टंट सादर करणार असल्याचे संकेत दिले होते. या अनुषंगाने बर्लीन शहरात सुरू झालेल्या आयएफए-२०१७ या प्रदर्शनात सोनी एलएफएस५०जी हा स्मार्ट स्पीकररूपी डिजीटल असिस्टंट सादर करण्यात आला आहे. अर्थात यासाठी सोनी कंपनीने गुगल असिस्टंटचा वापर केला आहे. म्हणजेच युजरला ओके गुगल या शब्दाने या स्पीकरला आज्ञा द्यावी लागणार आहे. गुगलने अलीकडेच आपला असिस्टंट थर्ड पार्टीजसाठी खुला करण्याची घोषणा दिली होती. यानंतर यावरच आधारित सोनी स्मार्ट स्पीकर लाँच करण्यात आलाय.सोनी स्मार्ट स्पीकर हा युजरचा डिजीटल असिस्टंट म्हणून काम करण्यास सक्षम आहे. वर नमूद केल्यानुसार कुणीही ओके गुगल म्हणून त्याला ध्वनी आज्ञावली देऊ शकतो. याच्या मदतीने कुणीही हवामानाबद्दलचे अपडेट, विविध नोटिफिकेशन्स, एसएमएस आदी मिळवू शकतात. याच्या मदतीने कुणीही आपल्या दैनंदिन कामांचे नियोजन करू शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे स्मार्टफोनसह घरातील अन्य स्मार्ट उपकरणे याला संलग्न करण्याची सुविधा आहे. आणि अर्थात या सर्व उपकरणांचे फंक्शन्स व्हाईस कमांडच्या मदतीने करणे शक्य होणार आहे. यात वाय-फाय, एनएफसी आणि ब्ल्यू-टुथ कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तर एका अ‍ॅपच्या मदतीने हा स्मार्ट असिस्टंट अन्य उपकरणांशी कनेक्ट करता येणार आहे. यात गुगलचे क्रोमकास्ट उपकरण इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. यामुळे कुणीही आपल्या स्मार्टफोनवरील संगीताचा यावर आनंद घेऊ शकेल.सोनी स्मार्ट स्पीकर या मॉडेलमध्ये ३६० अंशातील ध्वनी यंत्रणा प्रदान करण्यात आली आहे. याच्या मदतीने सर्व दिशांना एकाच क्षमतेच्या ध्वनीचे प्रक्षेपण करता येणार आहे. तर युजर्सच्या व्हाईस कमांडला नीट समजून घेण्यासाठी यात अतिशय संवेदनशील असे मायक्रोफोन प्रदान करण्यात आले आहेत. यातील अन्य फिचर्स सोनी कंपनीने जाहीर केलेले नाहीत. मात्र पुढील महिन्यात हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत सुमारे २०० डॉलर्सच्या आसपासच्या मूल्यात लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे. सध्या डिजीटल स्मार्ट स्पीकर असिस्टंटमध्ये गुगल होम आणि अमेझॉनचा इको हे मॉडेल्स आघाडीवर आहेत. तर अ‍ॅपलने काही महिन्यांपूर्वीच होमपॉडच्या माध्यमातून या क्षेत्रात पदार्पणाचे संकेत दिले आहेत. यातच आता सोनी एलएफएस५०जी या स्मार्ट स्पीकरची झालेली एंट्री लक्षणीय मानली जात आहे. या माध्यमातून सोनी कंपनी गुगल, अमेझॉन आणि अ‍ॅपलला आव्हान देणार असून एकंदरीतच डिजीटल स्मार्ट असिस्टंटच्या क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण होणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान