शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टरॉनचा जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: January 15, 2018 12:31 IST

स्मार्टरॉन कंपनीने तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज असणारा 'स्मार्टरॉन टी.फोन पी' हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे.

स्मार्टरॉनचा कंपनीच्या पी मालिकेतील हे मॉडेल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याची चर्चा सुरू होती. याला पूर्णविराम देत कंपनीने याचे अधिकृत अनावरण केले आहे. स्मार्टरॉन टी.फोन पी या मॉडेलमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स असले तरी वर नमूद केल्यानुसार यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यातील बॅटरी होय. यामध्ये ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल दोन दिवसांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात क्विक चार्जींगचा सपोर्ट असल्यामुळे ही बॅटरी फक्त ९० मिनिटांमध्ये पूर्णपणे चार्ज करता येते. महत्वाची बाब म्हणजे युएसबी-ओटीजी केबलच्या माध्यमातून या बॅटरीच्या मदतीने अन्य स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्टबँड आदी उपकरणांना चार्ज करता येते. यात एफ/२.२ अपार्चर आणि एलईडी फ्लॅशने सज्ज असणारा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात ब्युटिफाय, एचडीआर, पॅनोरामा, टाईम लॅप्स आणि बर्स्ट मोड प्रदान करण्यात आले आहेत. तर लो-लाईट फ्लॅशसह यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा आहे. यात दर्जेदार सेल्फीसाठी वाईड सेल्फी हे विशेष फिचर देण्यात आले आहे.

स्मार्टरॉन टी.फोन पी या मॉडेलमध्ये पूर्णपणे मेटल बॉडी दिलेली आहे. यात ५.२ इंच आकारमानाचा एचडी(१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर असेल. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह फिंगरप्रिंट स्कॅनर, ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, युएसबी-ओटीजी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

स्मार्टरॉन टी.फोन पी हा स्मार्टफोन ७,९९९ रूपये मूल्यात फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आला आहे. १७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता याचा पहिला फ्लॅश सेल होणार आहे. हा स्मार्टफोन खरेदी करणार्‍या ग्राहकाला ही कंपनी आपल्या टी क्लाऊड सेवेची तब्बल १ टेराबाईट इतके स्टोअरेज एक वर्षासाठी मोफत वापरण्यास देणार आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल