शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनला बनवा मायक्रोस्कोप

By शेखर पाटील | Updated: February 27, 2018 13:08 IST

तंत्रज्ञांनी आता थ्री-डी प्रिंटींग करून एक क्लिप तयार केली असून याच्या मदतीने कोणत्याही स्मार्टफोनला मायक्रोस्कोप या उपकरणामध्ये परिवर्तीत करता येते.

तंत्रज्ञांनी आता थ्री-डी प्रिंटींग करून एक क्लिप तयार केली असून याच्या मदतीने कोणत्याही स्मार्टफोनला मायक्रोस्कोप या उपकरणामध्ये परिवर्तीत करता येते.

स्मार्टफोनला मायक्रोस्कोप करण्याचे प्रयत्न आधीदेखील झाले आहेत. तथापि, ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञांच्या एका चमूने ही प्रक्रिया अतिशय सुलभ केली आहे. अ‍ॅडलेड विद्यापीठातील एआरसी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नॅनोस्केल बायोफोटोनिक्सच्या पथकाने थ्री-डी प्रिंटींगच्या मदतीने एक क्लिक तयार केली आहे. यात अतिशय उत्तम दर्जाचे भिंग लावण्यात आले आहे. ही क्लिप अगदी सहजपणे स्मार्टफोनच्या मागील बाजूस कनेक्ट करता येते. यानंतर या स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यातून मायक्रोस्कोप या उपकरणाप्रमाणेच सूक्ष्म वस्तू अगदी सहजपणे पाहता येतात. याच्या मदतीने एक मिलीमीटरच्या २००व्या भागापर्यंतचे सूक्ष्म जीव, पार्टीकल्स आदींना पाहता येते. यात रक्तपेशी, विविध जंतूंच्या पेशी, वनस्पती व प्राणी पेशी आदींचाही समावेश आहे. हे मायक्रोस्कोप विविध कामांमध्ये उपयुक्त ठरू शकते. यात पाण्यातील प्रदूषणासह विविध रोगांच्या निदानाबाबतची माहिती मिळू शकते. अनेक दुर्गम भागांमध्ये मायक्रोस्कोप सहजासहजी उपलब्ध होत नाही. या पार्श्‍वभूमिवर, हे तंत्रज्ञान वरदान सिध्द होऊ शकते. येत्या काही महिन्यांमध्ये ही क्लिप व्यावसायीक पातळीवर उपलब्ध करण्यात येणार आहे.