शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

बापरे! तुमच्याही स्मार्टफोनमध्ये 'हे' App आहे?; लगेचच करा डिलीट नाहीतर फोन होऊ शकतो हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 13:19 IST

Technology News : युजर्सचा डेटा चोरण्याचं काम करणाऱ्या अनेक अ‍ॅप्सवर कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - गुगल प्ले स्टोरवरून अनेक धोकादायक  अ‍ॅप्सना हटवलं आहे. युजर्सचा डेटा चोरण्याचं काम करणाऱ्या अनेक अ‍ॅप्सवर कारवाई करण्यात आली आहे. विविध छुप्या पद्धतींचा वापर करून अ‍ॅप्सच्या मदतीने हॅकर्स युजर्सना आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांचा पर्सनल डेटा चोरतात. असे अ‍ॅप्स हे हॅकर्स किंवा स्पाय फर्मकडून ऑपरेट केले जातात. याच दरम्यान आणखी एका अशाच अ‍ॅपबाबत माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे अ‍ॅप युजर्संचा फोन हॅक करू शकतो. 

सायबर सिक्योरिटी फर्म Trend Micro ने लोकप्रिय फाईल शेयरिंग अँड्रॉईड अ‍ॅप SHAREit मध्ये काही कमतरता शोधली आहे. Trend Micro च्या रिपोर्टनुसार, या अ‍ॅपमध्ये अनेक कमतरता आहेत. यामुळे याचा दुरुपयोग करून युजर्संचा संवेदनशील डेटा लीक केला जाऊ शकतो. हे अ‍ॅप वेगवेगळ्या फाईल्सला डाउनलोड आणि ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. याला भारतात बंदी आहे. मात्र 2019 मध्ये SHAREit सर्वात जास्त डाऊनलोड करणाऱ्या अ‍ॅपपैकी होतं. त्यामुळेच लाखो लोकांचा डेटा धोक्यात येऊ शकतो.

Trend Micro च्या एका सिक्योरिटी रिसर्चर ने, SHAREit मध्ये काही कमतरता असल्याचं शोधले आहे. त्यामुळे युजर्संचा संवेदनशील डेटा लीक केला जाण्याची भीती आहे. Trend Micro ने याची माहिती गुगलला दिली आहे. कंपनी प्ले स्टोरवर या अ‍ॅपसंबंधी मोठे पाऊल उचलू शकते. SHAREit चे एक बिलियन हून जास्त युजर्स आहे. या वर्षात सर्वात जास्त डाऊनलोड केलेल्या अ‍ॅप्सपैकी एक आहे. यानंतर सरकारने नोव्हेंबर 2020 मध्ये टिकटॉक सह 57 अन्य चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. त्यात SHAREit चा समावेश होता. 

आता नो टेन्शन! Facebook आणि Twitter पासून 'असा' वाचवा पर्सनल डेटा

Trend Micro ने SHAREit ला या प्रकरणी सूचना दिली आहे. परंतु, अद्याप त्यावर त्यांची प्रतिक्रिया आलेली नसल्याचं म्हटलं आहे. या रिपोर्टचा खुलासा हा रिसर्चच्या तीन महिन्यांनंतर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. फेसबुक आणि ट्विटरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या हॅकर्स युजर्सना विविध पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढत आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रायव्हसीचा मुद्दा हा जास्त चर्चेत आला आहे. आपली वैयक्तिक माहिती ऑनलाईन शेअर करताना काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सोशल मीडियाचा वापर हा हमखास केला जातो. मात्र त्याचा वापर करताना वेळळीच सावध होणं गरजेचं आहे. अन्यथा मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

Google Chrome ला खतरनाक व्हायरसचा धोका; केंद्र सरकारने जारी केले 7 फ्री टूल्स

Google Chrome ला खतरनाक व्हायरसचा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) भारतीय युजर्स संगणक, स्मार्टफोन आणि डिजिटल उपकरणांना नवीन व्हायरस बॉटनेटच्या अटॅकपासून बचाव करण्यासाठी 7 नवीन फ्री टूल्स दिली आहेत. MeitY ने हे पाऊल सायबर क्लीन सेंटर (बॉटनेट क्लीनिंग अँड मालवेअर अ‍ॅनालिसिस सेंटर) म्हणून उचललं आहे. इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) मार्फत हे टूल्स क्विक हील आणि ईस्कॅन सारख्या पार्टनर्ससोबत ऑपरेट केले जात आहेत. बॉटनेट्स हा इन्फेक्टटेड डिव्हाईसचा एक गट आहे जो हानिकारक काम करण्यासाठी एकत्रित काम करतो. हे डिव्हाईस हॅकर्सद्वारे नियंत्रित केले जातात. याच दरम्यान युजर्सना स्पॅम पाठवले जात आहेत. डेटा चोरी केला जात आहे. अनऑथोराइज्ड अ‍ॅक्सेस आहे ज्याद्वारे डीडीएसएसवर अटॅक केला जात आहे.

सावधान! ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात अडकलात?, सायबर क्राइमकडे 'अशी' करा तक्रार; वेळीच व्हा सतर्क

सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र हल्ली यामुळे होणाऱ्या फ्रॉडची संख्या देखील वाढली आहे. विविध मार्गांचा वापर करून हॅकर्स युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अनेक जण ऑनलाईन फ्रॉडचे शिकार होत आहेत. खासगी डेटा चोरी झाल्यास नेमकं काय करावं हे अनेकांना माहीत नाही. ऑनलाइन शॉपिंग किंवा डिजिटल पेमेंट करताना अनेकदा लोकांची फसवणूक केली जाते. सायबर क्राइमकडे याबाबत कशी तक्रार करायची ते जाणून घेऊया. तुम्हाला आता गरज वाटत नसेल, परंतू पुढे लागू शकते. कदाचित भाऊ, बहीण, मित्र-मैत्रिण, नातेवाईक, शेजारी यांना याबाबत कधीही ही माहिती लागू शकते. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनfraudधोकेबाजीMobileमोबाइल