शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सॅमसंगच्या गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशनची घोषणा

By शेखर पाटील | Updated: May 22, 2018 13:13 IST

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एस ८ या स्मार्टफोनमध्ये काही बदल करून याला नवीन स्वरूपात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एस ८ या स्मार्टफोनमध्ये काही बदल करून याला नवीन स्वरूपात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सॅमसंग गॅलेक्सी एस ८ या मॉडेलची नवीन आवृत्ती येणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र याच्या नावात गॅलेक्सी एस ८ दर्शविण्यात आलेले नाही. याऐवजी याला गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशन या नावाने बाजारपेठेत उतारण्यात येणार आहे.यामध्ये मूळ मॉडेलनुसार एज-टू-एज या प्रकारातील डिस्प्ले व फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेले असले तरी मात्र हार्ट रेट सेन्सरची सुविधा  नसेल. यात अन्य सर्व फिचर्स समान असले तरी मूळ मॉडेलपेक्षा ते कमी क्षमतेचे असणार आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशनमध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅश, ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि एफ/१.८ अपर्चरयुक्त १२ ड्युअलपिक्सल क्षमतेचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये एलईडी फ्लॅश आणि एफ/१.७ अपर्चरयुक्त ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यामध्ये वायर आणि वायरलेस या दोन्ही प्रकारातील चार्जींगच्या सपोर्टने सज्ज असणारी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ८ अर्थात ओरियो आवृत्तीवर चालणारा असेल. हे मॉडेल पहिल्यांदा चीनमध्ये लाँच करण्यात आले असून ते लवकरच भारतात सादर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :samsungसॅमसंगMobileमोबाइल