शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सॅमसंग सादर करणार हायब्रीड स्मार्टवॉच

By शेखर पाटील | Updated: August 8, 2017 13:58 IST

सॅमसंग कंपनीने स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर यांचा संगम असणारे हायब्रीड स्मार्टवॉच सादर करण्याचे संकेत दिले असून येत्या काही दिवसांत याची अधिकृत घोषणा होऊ शकते.

सॅमसंग कंपनीने स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर यांचा संगम असणारे हायब्रीड स्मार्टवॉच सादर करण्याचे संकेत दिले असून येत्या काही दिवसांत याची अधिकृत घोषणा होऊ शकते.

सध्या वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्यायोग्य उपकरणांमध्ये अपेक्षित घडामोडी होत नाहीत. खरं तर काही वर्षांपूर्वीच स्मार्टफोनची जागा वेअरेबल्स घेतील अशी भाकिते करण्यात आली होती. मात्र सध्या तरी स्मार्टवॉच, फिटनेस बँड/ट्रॅकर आदींचा अपवाद वगळता अन्य कोणतीही उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध नाहीत. स्मार्टवॉचचा विचार केला असता अ‍ॅपल, सॅमसंग, एलजी आदींसारख्या मातब्बर कंपन्यांपासून ते अनेक चीनी कंपन्यांनी विविध मॉडेल्स ग्राहकांना सादर केले आहेत. तर फिटनेस ट्रॅकरमध्ये फिटबीटसारख्या कंपन्या आघाडीवर आहेत. या पार्श्‍वभूमिवर सॅमसंग कंपनीने वेअरेबल्समध्ये दमदार पाऊल टाकण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.

सॅमसंग कंपनीने आपल्या आगामी प्रॉडक्टसाठी टॅगलाईनचा शोध सुरू केला आहे. या अनुषंगाने कंपनीच्या अनेक कर्मचार्‍यांना ई-मेल्स पाठविण्यात आले आहेत. यात आगामी प्रॉडक्टमध्ये गिअर जी ३ आणि गिअर फिट २ या दोन मॉडेल्सचा मिलाफ असेल असे नमूद करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे अनुक्रमे स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर या प्रकारातील असल्याने साहजीकच आगामी उपकरण हे हायब्रीड स्मार्टवॉच असेल असे मानले जात आहे. यात संबंधीत उपकरण हे वॉटरप्रूफ असून याच्या मदतीने अगदी नवशिक्या व्यक्तीपासून ते तज्ज्ञांना फिटनेसशी संबंधीत विविध बाबी उदाहरणार्थ वजन/कॅलरी व्यवस्थापन, विविध स्पोर्टस् अ‍ॅक्टीव्हिटीज आदींबाबत सखोल माहिती देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे हे हायब्रीड स्मार्टवॉच नेमके असेल तरी कसे आणि ते कधी सादर होणार ? याबाबत टेक्नोवर्ल्डमध्ये अतिशय औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे.