शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्लस: ड्युअल कॅमेरा, अनेक सरस फिचर्स

By शेखर पाटील | Updated: September 4, 2017 11:46 IST

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे ७ प्लस या स्मार्टफोनचे अनावरण केले असून यात ड्युअल कॅमेर्‍यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. 

ठळक मुद्देयात एलईडी फ्लॅशसह एफ/१.७ अपार्चरयुक्त १३ मेगापिक्सल्सचा मुख्य तर याच्या सोबत एफ/१.९ अपार्चरसह दुसरा कॅमेरा आहेयातील एक कॅमेरा मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी या प्रकारातील असेलया दोन्ही कॅमेर्‍यांनी एकत्रीतपणे अतिशय उत्तम दर्जाचे छायाचित्र काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे ७ प्लस या स्मार्टफोनचे अनावरण केले असून यात ड्युअल कॅमेर्‍यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. सॅमसंग कंपनीने काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी नोट ८ या मॉडेलला लाँच केले आहे. यात पहिल्यांदाच ड्युअल कॅमेर्‍याचे फिचर देण्यात आले होते. आता सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्लसमध्येही हीच सुविधा देण्यात आली आहे.

अर्थात हा ड्युअल कॅमेरा असणारा सॅमसंगचा दुसरा स्मार्टफोन ठरला आहे. यात एलईडी फ्लॅशसह एफ/१.७ अपार्चरयुक्त १३ मेगापिक्सल्सचा मुख्य तर याच्या सोबत एफ/१.९ अपार्चरसह दुसरा कॅमेरा आहे. यातील एक कॅमेरा मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी या प्रकारातील असेल. या दोन्ही कॅमेर्‍यांनी एकत्रीतपणे अतिशय उत्तम दर्जाचे छायाचित्र काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात प्रतिमांना बोके इफेक्ट देण्याची सुविधादेखील असेल. या दोन्ही कॅमेर्‍यातून काढलेल्या प्रतिमा या वन प्लस ५ आणि ऑनर ८ या मॉडेलप्रमाणे उत्तम दर्जाच्या असतील असे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एफ/१.९ अपार्चरसह १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्लस या मॉडेलमधील दुसरे महत्वाचे फिचर म्हणजे अल्वेज ऑन डिस्प्ले हे होय. यामुळे कुणीही युजरला नोटिफिकेशन पाहण्यासाठी आपल्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेला सुरू करण्याची आवश्यकता नाही. हा डिस्प्ले ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा सुपर अमोलेड या प्रकारातील असेल. सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्लस या मॉडेलमध्ये ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी २० हा गतीमान प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्लसमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. यात फिंगरप्रिंट स्कॅनर तसेच सॅमसंग कंपनीने विकसित केलेल्या बिक्सबी हा व्हर्च्युअल असिस्टंटही देण्यात आलेला आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्लस हे मॉडेल सर्वात पहिल्यांदा थायलंडमधील ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. तथापि, येत्या काही दिवसांत हे मॉडेल भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात येईल असे मानले जात आहे. याचे भारतातील मूल्य २५ हजारांच्या आसपास राहू शकते.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान